गायीला माता मानणाऱ्यांना ब्लॉक करतो- काटजू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये जे लोक गायीला माता मानतात किंवा गोरक्षकांचे समर्थन करतात, अशा लोकांना मी ब्लॉक करतो असे म्हटले आहे. 

काटजू यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्या लोकांना ते ब्लॉक करतात (फेसबुकवर) अशा लोकांची यादी त्यांनी दिली आहे. त्यामध्ये खालील लोकांचा समावेश आहे - 

  • जे लोक जातीव्यवस्थेला मान्यता देतात.
  • जे दलितांना कमी लेखतात.
  • जे लोक मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख किंवा इतर अल्पसंख्यांक समुदायाचा द्वेष करतात.
  • जे लोक साक्षी महाराज, आदित्यनाथ, तोगडिया, साध्वी प्राची आणि झाकीर नाईक, गिलानी आणि ओवेसींचे आणि त्यांच्या भाषणांचे समर्थन करतात.
  • जे लोक गायीला माता मानतात किंवा गोरक्षकांचे समर्थन करतात.
  • जे लोक भारताला हिंदूराष्ट्र मानतात.
  • जे लोक ज्योतिषशास्त्र आणि इतर अंधश्रद्धा मानतात.

या पोस्टमध्येच काटजू यांनी लिहिले आहे की, ‘जर अशा लोकांना कमी केले आणि जर माझे 5 लाख फेसबुक फालोअर्स कमी झाले तरीही मला त्याचे काही नाही. मी प्रसिद्धी किंवा लोकप्रियतेच्या मागे नाही किंवा मी कोणत्याही निवडणुकीचा उमेदवार नाही.‘

Web Title: Katju