अमर जनता! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

ही जनता अमर आहे, 
अमर आहे माकडहाड 
उखळामधल्या मुसळानेही 
भरत नाही तिजला धाड 

अमर जनता हसत राहाते, 
रडतेसुद्धा अधूनमधून 
बुभुक्षेच्या चाकावरती 
फिरत राहाते आरी बनून 

अमर जनता पसरत जाते 
जणू अमरवेल मेंदीवरती 
परपुष्टाच्या उत्साहाने 
पसरत जाते पृथ्वीवरती 

अमर जनते, काय तुझे 
असले वेडेविद्रे रूप 
फुटके नशीब, गळके प्राक्‍तन 
प्रारब्धाची कायम धूप 

अश्‍वत्थामन, तुझिया भाळी 
चिरंतनाचा एकच शाप 
तीच आहे अमर जनता 
भळभळणारी पोकळ खाप 

ही जनता अमर आहे, 
अमर आहे माकडहाड 
उखळामधल्या मुसळानेही 
भरत नाही तिजला धाड 

अमर जनता हसत राहाते, 
रडतेसुद्धा अधूनमधून 
बुभुक्षेच्या चाकावरती 
फिरत राहाते आरी बनून 

अमर जनता पसरत जाते 
जणू अमरवेल मेंदीवरती 
परपुष्टाच्या उत्साहाने 
पसरत जाते पृथ्वीवरती 

अमर जनते, काय तुझे 
असले वेडेविद्रे रूप 
फुटके नशीब, गळके प्राक्‍तन 
प्रारब्धाची कायम धूप 

अश्‍वत्थामन, तुझिया भाळी 
चिरंतनाचा एकच शाप 
तीच आहे अमर जनता 
भळभळणारी पोकळ खाप 

ही जनता अमर आहे, 
अमर आहे तिची भाषा 
जिवट हाड, कुबट श्‍वास 
भूक आहे तिचा धोशा 

अन्नान्नाच्या वासावरती 
सुटते दौडत हात पसरून 
दीड वितीच्या जगण्यासाठी 
मैलोगणती जळते ऊन 

अमर जनता हसते, गाते 
अभद्राचा अडके श्‍वास 
अस्तित्वाच्या चार भिंती, 
तिथेच होतात गूढ भास 

कुंद रात्री, किर्र रानी 
चवड्यांवरती काही पारधी 
शिकारीच्या मागावरती 
पडद्यामागे काही गारदी 

अमर जनता मात्र तेव्हा 
झोपून जाते ढाराढूर 
कांबळीमध्ये देह कोंबून 
कुढत राहतात चिंतातूर 

अमर जनते, किती सोसशील 
एकदाच कंबर कस पाहू 
पुरे झाले भिक्षांदेहि 
उभार बरे तुझे बाहू 

पण असल्या बंडखोरीत 
कसली तरी अमोघ मेख 
गिरबिटलेल्या लिपीत आहे, 
ललाटीचा बाष्कळ लेख 

पण पण पण काय? 
तुमच्या नाकात दोन पाय! 
अमर जनता जरी तेधवा 
अन्नामागे धावत जाय! 

अमर जनतेच्या गात्रांमध्ये 
कळिकाळाचा जरठपणा 
महाभूतांना पडसे येऊन 
दिक्‍कालाचा फुटे घुणा 

पसर पदर, विसर भान 
अमर जनते, हो पुढे! 
तुझ्यावाचून अभ्यंतरात 
विश्‍वंभराचे काय अडे? 

पत्रावळीच्या सुरकुतीतले 
उचल शीत गपगुमान 
पोट जाळ विनातक्रार 
अन्नालागी असतो मान 

ब्रह्मांडाच्या डोळ्यामध्ये 
डोळे खुपसून कोण पाहे? 
सॉक्रेटिसच्या प्याल्यामध्ये 
पचकन थुंकला टायको ब्राहे 

अमर जनते, तुझ्यासाठी 
पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे 
अन्नाभोवती फिरणारी पण 
ती जनता अमर आहे... 

ती जनता अमर आहे

Web Title: marathi news Pune News Dhing Tang