पौष! 

PNE17N19638
PNE17N19638

आत्ता कुटं मनासारका गारवा पडू लागलाय! 
सगळा मार्गेसर दवडून पौषाचा भिडू आलाय! 

पूर्वी कसा गडी जनू दौडत दौडत यायचा 
तालेवार जुझकऱ्यासारखा ध्याईलाच भिडायचा 

डुईला मुंडास, आक्‍कडबाज फ्येटा 
दिवाण्या मिश्‍श्‍या, व्हटात तंबाकूचा घोटा 

रंगच हुता न्यारा त्याचा, त्याला पुन्ना माज आलाय 
आत्ता कुटं मनासारका, गारवा पडू लागलाय! 

कवा जिन्यात गाठून काचकिनी मनगटच धरतंय 
वर नालायक म्हनतोय,-""त्याला काय हुतंय?'' 

अस्सा येडा पौष, त्याला लाज ना लज्जा 
गारव्याच्या नादानं उगा करतोय मज्जा! 

गारव्याचं निस्तं नाव, मामला गरमागरम झालाय, 
आत्ता कुटं मनासारका गारवा पडू लागलाय! 

हल्ली हल्ली पौषाला काय झालं की कळंना 
दमेकऱ्यावानी खोकत खाकरत येतोय म्हना! 

मागल्या टायमाला गडी कसा दनक्‍यात यायचा 
रातच्या पारी गपचिप दाराची कडी वाजवायचा 

आता वाट बगूनशान बी लौकर येईना झालाय, 
आत्ता कुटं मनासारका गारवा पडू लागलाय! 

घरात शिरून, बिनदिक्‍कत गडी बाजेवर पालथा 
निखळायचं नाव न्हाई वाटं, मेलाय का जित्ता? 

पिपात लोटकं बुडिवताना कडकडायचा बिजलीगत 
म्हातारं कोतारं बिच्च्यारं, त्यांची सत ना गत 

म्हात्ताऱ्या हाडास्नी, कवळ्या उन्हाचाच आसरा हाय, 
आत्ता कुटं मनासारका गारवा पडू लागलाय 

त्यातसुदिक मर्द गडी येकला जायचा हिरीवर 
दोन तांब्ये घिऊन म्हनायचा शंभोऽऽ हर हर! 

तिकडं कुटं नसायचंच पौषाचं ध्यान 
त्याच्या नदरंसमोर फकस्त रानजाईचं पान 

हारभऱ्याच्या श्‍येतात दहिवरानं कहार केलाय, 
आत्ता कुटं मनासारका गारवा पडू लागलाय! 

अवेळीच घुसून बेनं वल्लं करायचा शिवार 
ना येळ, ना काळ ना शरम ना दरकार! 

दवाचा थ्येंब बी पार आंबटढान झालाय, 
आत्ता कुटं मनासारका गारवा पडू लागलाय! 

अश्‍शानं आसं हुतंय पन गड्याला झालंय काय? 
पैल्यासारक़ं ऱ्हायलं न्हाई पौषाचं थकलं का पाय? 

दमगीर पावलानं वाजिवतंय माझं कवाड 
े""ये रे बाबा ये, तुला काय भरलीया धाड?'' 

""मी हाय त्योच गड्या, मळभ तुज्याच डोळ्यात हाय, 
म्हने, आत्ता कुटं मनासारका गारवा पडू लागलाय! 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com