अशी बोलते माझी कविता (चाता पेंढरकर)

चाता पेंढरकर, पुणे (०२०) २५४५२३७७
रविवार, 18 जून 2017

तूच सांग...

‘खूप चोऱ्या होतायत हल्ली
दार तेवढं लावून घे
ओळख पटल्याशिवाय
दार उघडू नकोस
आत कुणाला घेऊ नकोस’
असं सांगून निघून गेलास...

तेव्हापासून
सारी कवाडं बंद केल्येत मी

दाराला अगदी फटसुद्धा न ठेवता
अशीच बसून राहिल्येय
फक्त ओळखीची वाट पाहत

कुठूनसा आला पायरव
म्हणून
दार सताड उघडलं
तर तूच आला होतास
पण
अनोळखी प्रदेशातून आल्यासारखा
अगदी अनोळखी होऊन!

मग सांग,
आता तुला तरी
आत कसं घेऊ ?

दार उघडं ठेवू ?
की
बंद करू ?

तूच सांग...

‘खूप चोऱ्या होतायत हल्ली
दार तेवढं लावून घे
ओळख पटल्याशिवाय
दार उघडू नकोस
आत कुणाला घेऊ नकोस’
असं सांगून निघून गेलास...

तेव्हापासून
सारी कवाडं बंद केल्येत मी

दाराला अगदी फटसुद्धा न ठेवता
अशीच बसून राहिल्येय
फक्त ओळखीची वाट पाहत

कुठूनसा आला पायरव
म्हणून
दार सताड उघडलं
तर तूच आला होतास
पण
अनोळखी प्रदेशातून आल्यासारखा
अगदी अनोळखी होऊन!

मग सांग,
आता तुला तरी
आत कसं घेऊ ?

दार उघडं ठेवू ?
की
बंद करू ?

तूच सांग...!

टॅग्स