इंग्रजी : उद्‌बोधक आणि मनोरंजक

प्रा. एन.डी. आपटे
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

गेल्या वर्षी अमेरिकेतील शिकागो शहरात माझ्या मुलीकडे झालेल्या 2 महिन्यांच्या वास्तव्यात शिकागो ट्रिब्युन, न्यूयॉर्क टाईम्स यासारख्या दैनिकातून व व्हॅनिटी फेअर वोग (vogue) या नियतकालिकांच्या वाचनातून खूप नवे शब्द व उद्‌बोधक वाक्‍ये मिळाली. या लेखात त्यापैकी काहींचा विचार केला आहे.

हरघडीला 3 उद्‌बोधक किंवा सुचनांच्या तोडीच्या वाक्‍याची चर्चा करणार आहे. गुरु दादा जे.पी. वासवानी (वय त्यावेळी 98) शिकागोत केलेल्या आपल्या भाषणात म्हणाले, 'You are not fully dressed till you wear a smile on your face.'' म्हणजे तुम्ही चेहऱ्यावर हास्य धारण करेपर्यंत तुमच्या अंगावरच्या पोशाखाला पूर्णता येत नाही. म्हणजे चेहऱ्यावर हास्य नसणे ही पूर्ण पोशाखातील एक त्रुटी किंवा कमतरता आहे.

अमेरिकेचे ओमाबांच्या काळातील संरक्षण खात्याचे सेक्रेटरी चक हॅगेल (Chuck Hagel) यांनी ऑगस्ट 2014 मधील त्यांच्या शिकागोतील भाषणात एक मार्मिक विधान केले. ते म्हणाले 'We do not ergage in the world because we are a great nation. Rather we are a great nation because we engage in the world.'' म्हणजे आम्ही एक थोर देश आहे म्हणून जगाच्या प्रश्‍नात लक्ष घालतो असे नाही. उलट अमेरिका जगाच्या प्रश्‍नात लक्ष घालते हे अमेरिकेच्या थोरपणाचे कारण आहे. आम्ही जगाच्या हिताची काळजी घेतो, त्यात रस घेतो म्हणून अमेरिका एक थोर राष्ट्र झाले आहे, असे चक हॅगेल आपल्या देशाबद्दलच्या अभिमानाने म्हणत आहेत. शब्दांची फेरमांडणी अर्थामध्ये कसा आमूलाग्र बदल करु शकते याचे हे वाक्‍य उत्कृष्ट उदाहरण आहे.

तिसरे वाक्‍य हिलरी क्‍लिंटन यांच्याबद्दलचे... त्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत होत्या त्या काळातील आहे. 'टाईम' या अमेरिकन साप्ताहिकाच्या 15 फेब्रुवारी 2016 च्या अंकात म्हटले होते 'Her army of supporters will work their hearts out for her'' म्हणजे 'हिलरींची पाठिराख्यांची सेना त्यांच्यासाठी काहीही करेल, जीव ओतून काम करेल.' एक छान वाक्‍य मिळाले ना.

चौथे वाक्‍य तितकेच उद्‌बोधक. मला एका वृत्तपत्रात मिळाले. डाबर इंडिया कंपनीचे एक डायरेक्‍टर मोहित बर्मन म्हणाले 'You will never be perturbed by failure if you make it a part of being sucdessful'' म्हणजे अपयशाला यशस्वी होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग मानलात तर मग अपयशाने तुम्ही कधीच अस्वस्थ होणार नाही. (pertubed म्हणजे disturbed). अपयशाने खचून न जाण्याचा मंत्र बर्मन सांगतायत. म्हणजे पूर्ण यशाच्या मार्गात अडचणी, अपयश या गोष्टी पण असतात. यशाच्या प्रक्रियेचा तो एक भाग माना. मग पुन्हा त्रास होणार नाही.''

आता दोन तीन वाक्प्रचारांचा विचार करू. प्रत्यक्ष अध्यक्षीय निवडणूक होण्याच्या आधीच्या काळात हिलरी क्‍लिंटन यांना बरीच कामे करावी लागली. त्या कामांचे व्यवस्थापन करावे लागले. हे सांगण्यासाठी एका लेखकाने लिहिले- 'All this while secretary Clinton was getting her ducks in order, preparing for another run of the presidency in 2016''
Get your ducks in a row अशी मूळ म्हण (idiom) आहे. म्हणजे आपल्या कामाची व्यवस्था लावणे, त्याचे संघटन करणे असा अर्थ आहे. शब्दशः अर्थ तुमची बदके एका रांगेत मांडणे, त्याची रांग लावणे असा होतो. कामात व्यवस्थितपणा आणणे हेच या अर्थातून सुचित होते ना?
हिलरीची हुशारी प्रथम वेलेस्ली कॉलेजात दिसून आली. हे सांगण्यासाठी एका लेखकाने लिहिले- 'It was at Wellesley where she caught fire'' म्हणजे वेलेस्ली कॉलेजात त्या यशस्वी ठरल्या.
To catch fire - एक अर्थ to become markedly successful.

Catch on म्हणजे उठून दिसण्याइतके यशस्वी होणे असा आहे. दोन वाक्‍ये पहा - 'His ideas caught fire all over the country'.
दुसरे वाक्‍य "It was a good idea but it never really caught fire.'' अर्थ स्पष्ट आहे. आता एक तिसरा वाक्रप्रचार सांगतो तो आहे. Pie in the sky म्हणजे काहीतरी चांगले घडेल असे एखादा माणूस म्हणतो. पण तुम्हाला ते अशक्‍य वाटते, असे काही तरी. एक वाक्‍य पहा Hope of a cure is just pie in the sky (pie च्या मागे कोणतेही a, the असे उपपद वापरू नये).

हिलरी क्‍लिंटन यांच्यावर लिहिल्यानंतर आता अध्यक्ष ट्रम्प यांच्याबद्दलही थोडे लिहिणे ओघानेच आले. बीबीसी टीव्हीवर कार्यक्रम सादर करणाऱ्या सेलिना स्कॉट यांनी एक गौप्यस्फोट केला. त्या म्हणाल्या की ब्रिटनच्या दिवंगत युवराज्ञी डायना (Princess Diana) यांनी त्यांना सांगितले होते की, अमेरिकन अब्जाधीश व आजचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या केन्सिंग्टन पॅलेस या राजवाड्यावर फुलांच्या मोठ्या गुच्छांचा वर्षाव केला होता. (डायनांना भेट म्हणून) स्कॉटबाई म्हणाल्या की ट्रम्प तरीही म्हणाले की ते चार्ल्सच्याच बाजूचे (डायनाचे पती) आहेत. कारण डायना ही handful म्हणजे अवखळ, नियंत्रण करायला अवघड अशी स्त्री आहे. त्याच्यामध्ये तुम्ही handful या शब्दाला अवखळ असा अर्थ असेल अशी कधी कल्पना केली होती? handful या शब्दाचा म्हणून अर्थ 'नियंत्रण करायला अवघड अशी व्यक्ती' असा आहे. Someone, especially a child, who is difficult to control. एक वाक्‍य पहा- She is a lovely child but she can be a bit of a handful sometimes. अर्थ स्पष्ट आहे.
असाच दुसरा एक शब्द आहे अमेरिकेत भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना renters असे म्हणतात. एक वाक्‍य पहा- As rents rise, most local renters are staaying put. म्हणजे जागांची भाडी जशी वाढतायत तसे स्थानिक भाडेकरू आहे त्या ठिकाणीच राहत आहेत. To stay put म्हणजे आहे तेथेच राहणे.

Web Title: marathi news article english comprehensive, entertaining lingo