अशी बोलते माझी कविता (प्रणाली पाटोळे)

प्रणाली पाटोळे ९९२१६६३६०१
रविवार, 2 एप्रिल 2017

प्रश्‍नांच्या दुनियेत

 

वाट तर कदाचित तू आजही
बघत बसलेला असशील
पण माझ्याकडूनच चुकून
उशीर झालेला असेल...

 

माझ्या फुलणाऱ्या स्वप्नांना
मीच छाटलेलं असेल
वेळ निघून गेल्यावर...
मग विषयही संपलेला असेल

उरलेला प्रत्येक धागा
माझ्याकडूनच तुटलेला असेल
चूक कुणाचीच नाही
माणसं ओळखताना
जरा माझाच घोळ झालेला असेल

चांदण्यांच्या स्वप्नाळू दुनियेतल्या
माणसांना कशावरून
मीच वेडी भुललेली नसेन?
प्रश्‍नांच्या दुनियेत
उत्तरं शोधायला निघालेली
माझ्यासारखी मीच असेन!

प्रश्‍नांच्या दुनियेत

 

वाट तर कदाचित तू आजही
बघत बसलेला असशील
पण माझ्याकडूनच चुकून
उशीर झालेला असेल...

 

माझ्या फुलणाऱ्या स्वप्नांना
मीच छाटलेलं असेल
वेळ निघून गेल्यावर...
मग विषयही संपलेला असेल

उरलेला प्रत्येक धागा
माझ्याकडूनच तुटलेला असेल
चूक कुणाचीच नाही
माणसं ओळखताना
जरा माझाच घोळ झालेला असेल

चांदण्यांच्या स्वप्नाळू दुनियेतल्या
माणसांना कशावरून
मीच वेडी भुललेली नसेन?
प्रश्‍नांच्या दुनियेत
उत्तरं शोधायला निघालेली
माझ्यासारखी मीच असेन!