अशी बोलते माझी कविता (रेखा खराबे)

रेखा खराबे, पुणे ७३८५३८९७८५
रविवार, 5 मार्च 2017

भान

काल कुठंतरी सही करताना
माझं मलाच कळेनासं झालं

ते नाव, ती अक्षरं
अनोळखी, अपरिचित
वाटत राहिली

    ‘मी कोण?’ ‘माझं नाव काय?’
    हे मी सगळंच विसरून गेले आहे की काय?
    
त्या कागदावरची नक्षीच फक्त
निरखत राहिले मी...वेड्यागत

तंद्रीतून भानावर आले
ती काहीशी दचकतच
आणि काहीशी आनंदातही!

    दचकत अशासाठी, की
    आजवर कैक नात्यांच्या गुंतवळीत
    विसररूनच गेले होते मी माझं अस्तित्व

भान

काल कुठंतरी सही करताना
माझं मलाच कळेनासं झालं

ते नाव, ती अक्षरं
अनोळखी, अपरिचित
वाटत राहिली

    ‘मी कोण?’ ‘माझं नाव काय?’
    हे मी सगळंच विसरून गेले आहे की काय?
    
त्या कागदावरची नक्षीच फक्त
निरखत राहिले मी...वेड्यागत

तंद्रीतून भानावर आले
ती काहीशी दचकतच
आणि काहीशी आनंदातही!

    दचकत अशासाठी, की
    आजवर कैक नात्यांच्या गुंतवळीत
    विसररूनच गेले होते मी माझं अस्तित्व

आणि आनंदात अशासाठी, की
‘मी कोण?’
‘माझं नाव काय?’
असे निदान प्रश्‍न तरी पडायला
आता सुरवात झाली आहे...!

टॅग्स