सोशल मीडियावरचं गाजलेलं... (सतीश तांबे)

सतीश तांबे satishstambe@gmail.com (९८२१२६२५५५)
रविवार, 22 जानेवारी 2017

आता कुठे जाशील ट्रोलंभट्टा?

काळाची गरज म्हणून उदयाला येणाऱ्या
संज्ञा, संकल्पना जेव्हा
भावी काळात आपल्याला
जाचक-घातक ठरू शकतील असे जाणवते,
तेव्हा त्यांची खिल्ली उडवून
त्यांचा बालमृत्यू घडवण्याचा कावेबाजपणा
हा तसा पूर्वापार आहे.

जसं की स्वाती चतुर्वेदी ह्यांचं पुस्तक
चर्चेत आल्यापासून खिल्ली उडवली जात आहे,
ट्रोल ह्या शब्दाची...

अशावेळी त्या संज्ञा-संकल्पनेचे स्वरूप
निश्‍चित करणे गरजेचे असते..

आता कुठे जाशील ट्रोलंभट्टा?

काळाची गरज म्हणून उदयाला येणाऱ्या
संज्ञा, संकल्पना जेव्हा
भावी काळात आपल्याला
जाचक-घातक ठरू शकतील असे जाणवते,
तेव्हा त्यांची खिल्ली उडवून
त्यांचा बालमृत्यू घडवण्याचा कावेबाजपणा
हा तसा पूर्वापार आहे.

जसं की स्वाती चतुर्वेदी ह्यांचं पुस्तक
चर्चेत आल्यापासून खिल्ली उडवली जात आहे,
ट्रोल ह्या शब्दाची...

अशावेळी त्या संज्ञा-संकल्पनेचे स्वरूप
निश्‍चित करणे गरजेचे असते..

मुळात विशिष्ट व्यक्ती
ही सदासर्वदा ट्रोल असतेच असं नाही.
ती एरवी साळसूदही असू शकते...
तर गरजेनुसार ट्रोलिंग करते,
तर म्हणून ट्रोलिंग ह्या क्रियेविषयी विचार करणे
गरजेचे आहे..

माझ्या मते एखाद्याच्या वॉलवर जाऊन
तिथली आपल्याला विरोधी वाटणारी
चर्चा उधळून लावण्यासाठी धिंगाणा घालणे
म्हणजे ट्रोलिंग होय.
इथेच लिहिलेल्या कॉमेंट्‌स
जर त्याने स्वतःच्या भिंतीवर केल्या,
तर ते अर्थातच ट्रोलिंग ठरणार नाही.

थोडक्‍यात काय, तर
ट्रोलिंग हे दुसऱ्याच्या वॉलवरची चढाई/ हल्लेखोरी असते.
आणि ते ठरवणार अर्थातच ज्याची वॉल असेल तो.

असुनी खास मालक घरचा
म्हणती ट्रोल त्याला...
हे गैरलागू आहे.

ट्रोलिंग कशाला म्हणावे?
याबाबतीत आपली मते मांडणे
हे गरजेचे आहे.
कारण, ट्रोलिंग ही संज्ञा, संकल्पना
भावी काळात कामाची ठरणार आहे.
....ट्रोल्सची भांडाफोड व्हायलाच हवी.

टॅग्स

सप्तरंग

तोंडी तलाक हा भारतीय मुस्लिम समाजात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय बनला आहे. तोंडी तलाकला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुस्लिम समाजातील तोंडी तिहेरी तलाक देण्याच्या प्रथेवर मागील अनेक महिन्यांपासून उहापोह सुरू असून, याबाबत न्यायालयात याचिका दाखल...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

महाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात अतिविराट अशा अर्थाने जनसमुदाय एकत्रित झाला ते निमित्त म्हणजे "मराठा मोर्चा."...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017