साप्ताहिक भविष्य (रविवार, मे 14, 2017 ते शनिवार, मे 20, 2017)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

रविवार, मे 14, 2017 ते शनिवार, मे 20, 2017

मेष: विलक्षण माणसं भेटतील! आजचा रविवार सूर्योदयी वेदनायुक्त. घरातल्या वृद्धांची चिंता. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत कष्टप्रद काळ. बाकी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या विलक्षण माणसांशी गाठीभेटी होतील. ता. १६ व १७ हे दिवस महत्त्वाच्या सरकारी कामांचे. सप्ताहाचा शेवट प्रेमिकांना मार्गस्थ करणारा. विवाहविषयक घडामोडी.

रविवार, मे 14, 2017 ते शनिवार, मे 20, 2017

मेष: विलक्षण माणसं भेटतील! आजचा रविवार सूर्योदयी वेदनायुक्त. घरातल्या वृद्धांची चिंता. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत कष्टप्रद काळ. बाकी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या विलक्षण माणसांशी गाठीभेटी होतील. ता. १६ व १७ हे दिवस महत्त्वाच्या सरकारी कामांचे. सप्ताहाचा शेवट प्रेमिकांना मार्गस्थ करणारा. विवाहविषयक घडामोडी.

वृषभ: शैक्षणिक चिंता जाईल सप्ताह गुरू-शुक्राच्या विशिष्ट स्थितीतून क्‍लिक होणारा. शैक्षणिक चिंता जाईल. परदेशगमनाची संधी. पती वा पत्नीचा मोठा उत्कर्ष. मृग नक्षत्राच्या व्यक्ती जीवनात मोठी झेप घेतील. ता. १६ ते १८ हे दिवस ‘बहारों फूल बरसाओ’ असेच! कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी अग्निभय.

मिथुन: नोकरीत प्रशंसा होईल मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मातृ-पितृ चिंता राहील. आजच्या रविवारची संध्याकाळ अशांत. बाकी आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती प्रीतीचा रंग उधळतील! मनपसंत खरेदी होईल. नोकरीत प्रशंसा होईल. सोमवार विलक्षण राहील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी शुभघटनांमुळं आनंदाश्रू अनावर होतील.

कर्क: वैवाहिक जीवनात प्रसन्न राहाल पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना आजच्या रविवारची संध्याकाळ कायदेशीर प्रश्‍नांतून व्यथित करणारी. दुष्टोत्तरं टाळा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ ते १८ हे दिवस मोठे नावीन्यपूर्ण...वैवाहिक जीवनात प्रसन्न करणारे. आश्‍लेषा नक्षत्रांच्या तरुणांना स्पर्धात्मक यश. ज्ञानी माणसं भेटतील.

सिंह: व्यावसायिक गाठी-भेटींना यश मघा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार विचित्र शंका-कुशंकांनी त्रस्त करणारा. क्वचित मातृचिंता शक्‍य. बाकी पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सोमवार गाठी-भेटी, मुलाखती, तसंच इतर महत्त्वाच्या करारमदारांद्वारे भवितव्य ठरवणारा. शनिवारी महागड्या नाजूक वस्तू तुटू-फुटू देऊ नका.

कन्या: वाहन चालवताना काळजी घ्या उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी आज वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. सिग्नल पाळावा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ ते १८ हे दिवस अतिशय अनुकूल. तरुणांचं भवितव्य ठरेल. व्हिसा मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ज्वरपीडा. शनिवारी काचसामान काळजीपूर्वक हाताळा.

तूळ: फ्रेंड- फिलॉसॉफर-गाईड भेटेल मानसिक पथ्यं पाळा. आजच्या रविवारी विचित्र वाद घडण्याची शक्‍यता. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी जपून राहावं. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १७ व १८ हे दिवस अतिशय सुंदर. फ्रेंड-फिलॉसॉफर-गाईड भेटेल. नोकरीतला एखादा त्रास संपेल. शनिवार संतसंगतीचा.

वृश्चिक: प्रीतीचा सुगंध लाभेल शुभग्रहांची मंत्रालयं ॲक्‍टिव्ह राहतील. ता. १६ ते १८ हे दिवस अतिशय सुगंधित. घरात कार्यं ठरतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मानमरातब-सन्मान मिळेल. कलाकारांना मोठं ग्लॅमर मिळेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रीतीचा सुगंध लाभेल. कला-करमणुकीतून आनंद.

धनु: नोकरीत अनुकूल वातावरण आजचा रविवार सूर्योदयी बेरंग करणारा. प्रिय वस्तूंची नासधूस. बालहट्टातून त्रास. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती ता. १७ व १८ रोजी सुरांच्या सहवासात राहतील. प्रिय व्यक्तींचं सान्निध्य लाभेल. नोकरीतलं स्वास्थ्य वाढेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र धावपळीचा. वस्तू हरवतील.

मकर: भाव-भावनांवर ताबा ठेवा आजचा रविवार विचित्र मनोव्यथेचा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शत्रुत्वाचं सावट अस्वस्थ करेल. भाव-भावनांवर ताबा ठेवा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस अतिशय शुभलक्षणी. विवाहेच्छूंना होकार मिळेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारची संध्याकाळ कलहजन्य.

कुंभ: नोकरीत बढतीकडं वाटचाल! धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मानवी उपद्रवांना सामोरं जावं लागेल. एखादी राजकारणी व्यक्ती त्रास देण्याची शक्‍यता. सावध राहा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी सुवार्ता मिळतील. नोकरीत बढतीकडं वाटचाल. शनिवारी अन्न-पाण्यातून संसर्ग शक्‍य. श्‍वानांपासून सावध राहा. दंश शक्‍य.

मीन: जुन्या गुंतवणुकींतून मोठे लाभ पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार उपद्रवकारकच. विचित्र नुकसानीच्या घटना. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस शुभग्रहांच्या जबरदस्त साथसंगतीचे. मुला-बाळांची कार्यं ठरतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून मोठे लाभ.

Web Title: Weekly horoscope (14 May to 20 May 2017)

टॅग्स