साप्ताहिक राशिभविष्य (२२ ऑगस्ट २०२१ ते २८ ऑगस्ट २०२१)

‘पृथ्वी’ हा एक भोग आहे. अर्थातच हा पंचमहाभूतांचा भोग या पृथ्वीवर एकप्रकारचा निरंतर होमच चालू ठेवत असतो असेच गीता सांगते !
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

नका होऊ कृतघ्न!

‘पृथ्वी’ हा एक भोग आहे. अर्थातच हा पंचमहाभूतांचा भोग या पृथ्वीवर एकप्रकारचा निरंतर होमच चालू ठेवत असतो असेच गीता सांगते ! या होमामध्ये (आकाशात) पृथ्वीच्यावर सूर्याच्या साथसंगतीत चंद्राला बरोबर घेऊन सतत हवन चालू ठेवणारा हा पंचमहाभूतांचा होम म्हणजे त्यांचा एकमेकांचा भोगच आहे. माणूस हे पंचमहाभूतांच्या या निरंतर होमाचे एक केवळ माध्यम आहे. या माणूस नावाच्या माध्यमाने विश्‍वाचा मालक होण्याचा प्रयत्न केला, की हीच पंचमहाभूतं किंवा या पंचमहादेवता त्यांचे प्रारब्ध घडवतात किंवा या माणूस नावाच्या चोराला शिक्षा घडवतात किंवा त्याप्रमाणे सुख-दुःख भोगायला लावतात!

आज श्रावण पौर्णिमा आहे. श्रावण महिना हा पंचमहाभूतांना कृतज्ञता दर्शविण्यासाठी विशिष्ट व्रत-वैकल्यांचा पाठपुरावा करतो. ऋतुचक्रातील बारा पौर्णिमा आणि बारा अमावस्या या आपल्या संस्कृतीत पर्वण्या मानल्या जातात. परतत्त्वाशी संधान साधते तीच पर्वणी होय! अशा या चोवीस पर्वण्या पंचभूतांचे सहाय्य घेत साजऱ्या केल्या जात असतात.

माणूस ज्या वेळी कृतघ्न होतो त्या वेळी त्याचे जीवन हे एक कुरूक्षेत्र बनते! मग श्रीकृष्ण परमात्मा पंचपांडवांना जवळ करत हनुमानाचा ध्वज असलेल्या रथाचे सारथ्य करत अर्जुनाकडून शरसंधान करून या कृतघ्नांना धडा शिकवतो. हीच ती भगवद्‌गीता!

मित्रहो, आजची श्रावण पौर्णिमा गुरूतत्त्वाचा स्पर्श अनुभवणारी आहे. कारण आजच्या पौर्णिमेला चंद्र-गुरूचा गजकेसरी योग होत आहे. पंचमहाभूतांचं मांगल्य जपणं म्हणजेच प्रकृतीचं अर्थातच निसर्गाचं मांगल्य जपणं आहे आणि या प्रकृतीविषयीचा कृतज्ञताभाव म्हणजेच हे निसर्गातील `पवित्र’ रक्षाबंधन होय!

यत्र. योगेश्‍वर: कृष्णो यत्र पार्थोधनुर्धरः।

तत्र श्रीविजचया भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिमम।।

- भगवद्‌गीता

मोठे लाभ होतील

मेष : अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरूभ्रमणाचा पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठा लाभ होईल. ता. २२ ते २४ हे दिवस मोठे प्रवाही राहतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर खराब. ता. २८ चा शनिवार जपाच. बाकी कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी पौर्णिमा भाग्यबीजं पेरेल. ओळखीतून लाभ.

नोकरीत भाग्योदय होईल

वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ ते २४ हे दिवस विशिष्ट करारमदार करवतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी उद्याचा सोमवार व्यावसायिक उत्सवप्रदर्शने यशस्वी करवेल. जाहिरातीद्वारे लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह नोकरीत भाग्योदयाचाच. बुधवार मोठ्या सुवार्तांचा. शनिवारी प्रवासात सांभाळा.

ग्रहांची साथ, वास्तुयोग येईल

मिथुन : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र शुभ ग्रहांच्या उत्तम साथसंगतीचे. ता. २२ ते २५ हे दिवस जबरदस्त कनेक्‍टिव्हिटीचे. मोठी खरेदी-विक्री. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावेत. अपरिचीत व्यक्तींकडून धोका. बाकी बुधवारची संकष्टी वास्तुयोग आणेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वादाचा.

नाकासमोर चाला, संमिश्र कालखंड

कर्क : सप्ताह पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात संमिश्र स्वरूपाची फळे देईल. कोणताही अतिरेक नको. नाकासमोर चाला. नोकरीतील राजकारणात पडू नका. बाकी शुक्र-शनीचा शुभ योग थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ देईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार बेरंगाचा. राजकीय दहशत.

विजयोत्सव व परिसस्पर्श लाभेल

सिंह : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात गुरूभ्रमणाची जबरदस्त स्पंदनं राहतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विशिष्ट छप्पर फाडके लाभ होतील. ता. २५ चा बुधवार अनेक बाबतीत परिसस्पर्शाचा राहील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ चा मंगळवार विजयोत्सवाचा. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या खरेदी-विक्रीचा. अनपेक्षित गाठीभेटी.

विवाहस्थळांच्या दृष्टीने चांगला काळ

कन्या : राशीचे शुक्रभ्रमण ता. २४ ते २५ या दिवसांत एक ग्रासकोर्ट ठेवेल. गाठीभेटींतून ग्रीन सिग्नल. विवाहस्थळांकडे लक्ष द्या. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना कोरोनाच्या पार्स्वभूमीवरही लाभ. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजची पौर्णिमा घरात सुवार्तांची. मात्र शनिवारी विसराविसरीतून धावपळ.

व्यावसायिक क्षेत्रात लाभ

तूळ : आजच्या पौर्णिमेचे एक वैशिष्ट्यपूर्णच फिल्ड राहील. सप्ताहावर चंद्रकलांचा पूर्ण अंमल राहील. शुभ ग्रहांची स्पंदनं खेचूनच घ्या. अर्थात सत्संग ठेवा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी आपले अँटिने स्वच्छ ठेवा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ व २४ हे दिवस व्यावसायिक उठाठेवींतून लाभ देतील. बाकी स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवार सांभाळा.

दैवी चमत्काराचा अनुभव येईल

वृश्‍चिक : सप्ताहात विशिष्ट परिस्थितीत चंद्रबळाचा लाभ घ्याल. ता. २५ व ता. २६ हे दिवस दैवी चमत्काराचे. अवघड कामे होतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी इम्युनिटी डोस. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी यंत्र, वाहन आणि कामगार या घटकांतून त्रास. रस्त्यावर जपा.

जे ठरवाल ते होईल

धनु : साडेसातीतही चंद्रकलांचा उत्कर्ष सप्ताहाच्या सुरुवातीस मोठी रसद पुरवेल. गुरूस्मरण ठेवा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २४ आणि २७ हे दिवस परिसस्पर्शाचे. म्हणाल ते होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २४ आणि २५ हे दिवस घरात उत्सवमूर्ती बनवतील. काहींचे वास्तुप्रवेश.

व्यावसायिक विरोध मावळेल

मकर : सप्ताहात हर्षलचा प्रभाव राहीलच. पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाचे. घरात शांतच राहा. बाकी उत्तराषाढा नक्षत्रास सप्ताह व्यावसायिक विरोध घालवणारा. ता. २४ व २५ हे दिवस श्रवण नक्षत्रास विशिष्ट विजयोत्सव साजरा करणारे. मात्र शनिवारी वाहनं जपा.

नोकरीच्या संधी येतील

कुंभ : पौर्णिमा गुरूभ्रमणाच्या वरदहस्ताची. आजचा रविवार विशिष्ट भाग्यसंकेत देईल. शततारका नक्षत्राचे व्यावसायिक संकटविमोचन. धनिष्ठा नक्षत्राची शैक्षणिक प्रगती. नोकरीच्या संधी येतील. पूर्वाभाद्रपदा व्यक्तींना ता. २४ चा मंगळवार विचित्र गाठीभेटींचा. संयम बाळगा. स्त्रीवर्गाशी जपून.

करारमदार व मौल्यवान खरेदी करा

मीन : आजच्या पौर्णिमेचं फिल्ड अतिशय संमिश्र स्वरूपाचे. घरातील भावनिक मुद्दे सांभाळा. घरातील तरुणांशी वाद नकोत. बाकी ता. २४ ते २६ हे दिवस शुभ ग्रहांच्या कनेक्‍टिव्हिटीचे. विवाह ठरवा. करारमदार करा. विशिष्ट मौल्यवान खरेदी करा. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचे मार्केटिंग यशस्वी होईल. रेवती व्यक्तींनी शनिवारी पाकीट जपावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com