'व्हे प्रोटिन्स'पासून रेशीम निर्मिती

पीटीआय
बुधवार, 25 जानेवारी 2017

स्टॉकहोम - रेशीम हे फक्त टेक्साटाईल क्षेत्रातच नाही तर इतर अनेक क्षेत्रात वापरले जाते. जगभरात रेशीम हे किटकांचे संगोपन करुन मिळविले जाते. परंतु, आता गायीच्या दुधापासून तयार होणाऱ्या 'व्हे प्रोटिन'च्या आधारे शास्त्रज्ञांनी रेशीम निर्मिती केली आहे. 

स्वीडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील तज्ञ स्टिफन रॉथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या रेशमाचा अनेक क्षेत्रात उपयोग होऊ शकतो. जसे की, जखम झाल्यानंतर ड्रेसिंग करताना विरघळणारे टाके घालण्याठी. 

सध्या कृत्रिमरित्या मिळालेले हे रेशीम 5 मिलीमीटर एवढे असुन, ते सर्वसाधारण दर्जाचे आहे. यावरिल पुढील संशोधन सुरु असुन, हे कृत्रिम रेशीम वापरुन त्याचे लांब व टिकाऊ धागे तयार करता येतील का असा प्रयत्न सुरु असल्याची माहिती रॉथ यांनी दिली आहे.
 
टॅग्स