ऊर्जेची बचत करणारा "एसी'!

वृत्तसंस्था
शनिवार, 24 डिसेंबर 2016

काही वर्षांत एअर कंडिशनिंग तंत्रज्ञानात फारसा बदल झालेला नाही. यातील अनेक पर्याय ऊर्जेचा अपव्यय करणारे तर काही दिसायला अनाकर्षक आहेत. बार्सिलोनामधील "इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड आर्किटेक्‍चर ऑफ कॅटॅलोनिया' या कंपनीने निसर्गाकडून प्रेरित होऊन विजेशिवाय चालणारा एक अनोखा एसी विकसित केला आहे.

या वास्तुविशारदांनी"हायड्रोजेल'चा वापर करून वातावरण थंड करण्याची नवी पद्धत शोधली आहे. यामध्ये त्यांनी हायड्रोजेल वापरून आर्द्रता शोषून मानवी त्वचेसारखा "घाम' येऊ शकणारी भिंत तयार केली आहे. हायड्रोजेल पाणी शोषून त्याच्या आकाराच्या पाचशे पट अधिक मोठे होऊ शकत असल्याने या तंत्रज्ञानासाठी अधिक उपयुक्त ठरले आहे.

दोन सिरॅमिक थरांमध्ये हायड्रोजेलचा थर वापरून ही भिंत तयार करण्यात आली आहे. या भिंतीच्या आजूबाजूचे वातावरण गरम असल्यास भिंतीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन बाहेरची हवा 5 ते 6 अंश सेल्सिअसपर्यंत थंड केली जाईल. या तंत्रामध्ये "उपजत बुद्धिमत्ता' वापरली आहे. बाहेरील तापमान जास्त असेल तेव्हाच हा एसी हवा थंड करणार आहे. त्याच्या वापरामुळे 28 टक्के ऊर्जेची बचत होईल व कार्बन उत्सर्जन 56.5 किलोग्रॅमने कमी करणे शक्‍य आहे,''असे संशोधकांनी सांगितले.