फेसबुकची नवी सुविधा 'फाईंड वाय-फाय'; ऑफलाईन असतानाही मिळणार माहिती

टीम ई सकाळ
बुधवार, 5 जुलै 2017

फेसबुकने "फाईंड वाय-फाय' नावाची आणखी एक नवी सुविधा दिली असून त्याद्वारे युजर्सना कनेक्‍ट राहण्यासाठी आवश्‍यक असलेल्या जवळच्या "वाय-फाय' कनेक्‍शनबाबतची माहिती दिली जाणार आहे. वास्तविक मागील वर्षीच ही सुविधा फेसबुकने सुरू केली आहे. मात्र, आता जगातील सर्व युजर्ससाठी ही सुविधा एकाच वेळी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फेसबुक सांगणार जवळचे "वाय-फाय'; इंटरनेट नसेल तरीही मिळणार माहिती मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - जगाशी "कनेक्‍ट' राहण्यासाठी सतत नाविन्यपूर्ण, कल्पक, सहज, सोप्या सुविधा देणाऱ्या फेसबुकने आपल्या युजर्सना त्यांच्या आजूबाजूच्या "वाय-फाय' कनेक्‍शनबद्दल माहिती देण्याची नवी सुविधा दिली आहे. विशेष म्हणजे युजर प्रवासात असेल किंवा त्याचे इंटरनेट कनेक्‍शन सुरू नसेल तरीही फेसबुकद्वारे आजूबाजूच्या वाय-फाय कनेक्‍शनबाबतची माहिती मिळणार आहे. याबाबत फेसबुकने एका ब्लॉग पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

युजर्सना अधिकाधिक सक्रिय ठेवण्यासाठी त्यांच्या जगण्याशी संबंधित सुविधा देण्याचा फेसबुकचा सतत प्रयत्न असतो. त्यामुळेच फेसबुकच्या सक्रिय युजर्सच्या संख्येने नुकताच 200 कोटींचा आकडा पार केला आहे. आता फेसबुकने "फाईंड वाय-फाय' नावाची आणखी एक नवी सुविधा दिली असून त्याद्वारे युजर्सना कनेक्‍ट राहण्यासाठी आवश्‍यक असलेल्या जवळच्या "वाय-फाय' कनेक्‍शनबाबतची माहिती दिली जाणार आहे. वास्तविक मागील वर्षीच ही सुविधा फेसबुकने सुरू केली आहे. मात्र, आता जगातील सर्व युजर्ससाठी ही सुविधा एकाच वेळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सतत प्रवासात असणाऱ्या युजर्सना समोर ठेवून ही सुविधा देण्यात आली आहे. मोबाईल वाय-फायद्वारे किंवा मोबाईल कनेक्‍शनद्वारे कनेक्‍ट नसेल तरीही ही आजूबाजूच्या "वाय-फाय' बाबत युजर्सना माहिती मिळणार आहे. ऍड्रॉईड आणि आयओएससाठी "फाईंड वाय-फाय'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फेसबुकच्या नव्या व्हर्जनसमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे.