चला बॅकअप दिन साजरा करु...

backup
backup

आज 31 मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. ह्या दिवसाची ओळख साधारणपणे सगळ्यांना आर्थिक वर्षाची समाप्ती अशीच माहीत आहे. परंतु हा जागतिक बॅकअप दिन म्हणुनही साजरा केला जातो. माणसाच्या जीवनात डिजीटल उपकरणाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मग ते वैयक्तिक जीवन,कामाचे ठिकाण,व्यवसाय असो सगळीकडे संगणीकरण झाले. मोबाईल फोन, टॅबलेट, लॅपटॉप, संगणक  इ. गोष्टींचा वापर वाढल्याने त्यामधील फोटो, व्हिडीओ, वैयक्तिक तसेच व्यवसायाची माहिती (डेटा) खुप महत्त्वाची झाली आहे.

आपल्या लहानपणी आठवणींचे, आपल्या लग्नाचे, मुलांचा पहिला फोटो, व्हिडीओ, काही आठवणीतल्या सहलींच्या स्मृती, फोन नंबर तसेच सगळे दैनंदिन व्यवहार, व्यवसायाचे आर्थिक, कर्मचाऱ्यांचा हिशोब, बँकेची,कर्जाची, आरोग्यविषयी तपासण्या इ. सगळी माहीती अचानक गायब झाली तर?

अशी माहिती अचानक गमावली जाण्याची शक्यता असते म्हणुनच अशी महत्त्वाची माहीती जतन करणे महत्त्वाचे आहे. जर ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर तीची नक्कल(बॅकअप) करुन ठेवणेही आवश्यक आहे. असं म्हणतात की उपाय करण्यापेक्षा असे काही घडू नये म्हणुन याचा प्रतिबंध करणे कधीही चांगली सवय आहे.

Data loss म्हणजे काय ?
माहिती प्रणाली किंवा प्रक्रिया नादुरुस्त होणे, व्हायरसचा प्रादुर्भाव होणे, दुर्लक्ष अथवा आपल्या त्रुटीमुळे माहिती नष्ट होणे किंवा जतन होणाऱ्या भागात(स्टोरोज) बिघाड होणे अशा कारणांमुळे सर्व माहिती अचानकपणे नष्ट होणे म्हणजेच Data loss होणे.

Data Backup म्हणजे काय ?
महिती तंत्रज्ञानात, बॅकअप किंवा बॅकअप प्रक्रियेत संगणक डेटा कॉपी किंवा संग्रहित करुन त्याची प्रत तयार करणे, त्यामुळे जर तो डेटा नष्ट झाला तर नंतर मुळ डेटा पुनर्संचयित करण्यासाठी हि प्रत वापरली जाऊ शकते.

Data Backup कसा घ्यावा
माहिती तंत्रज्ञानात, बॅकअप किंवा बॅकअप प्रक्रियेत संगणक डेटा कॉपी किंवा संग्रहित करुन त्याची प्रत तयार करणे, त्यामुळे जर तो डेटा नष्ट झाला तर नंतर मुळ डेटा पुन्हा मिळवण्यासाठी हि प्रत वापरली जाऊ शकते.

बॅकअप डिव्हाइसची निवड
आपली महत्त्वाच्या माहितीचा बॅकअप घेण्यासाठी योग्य साधनाची निवड करावी. बॅकअप हा संगणकाच्या बाहेर असावा. जेणेकरुन जर संगणक,मोबाइल, लॅपटॉप,खराब झाला किंवा हरवला तर आपली माहिती परत सहजरित्या परत जतन करता येईल. काही पर्याय External Hard Disc, पेन किंवा USB ड्राईव,मेमरी कार्ड किंवा ऑनलाईन इंटरनेट बॅकअप(Cloud) असे काही सोयीस्कर पर्याय उपलब्ध आहेत.

घेतलेल्या बॅकअपची पडताळणी
आपण वेळोवेळी घेतलेल्या बॅकअपची पडताळणी नियमित करणे तितकेच महत्त्वाचे आहे. बॅकअप प्रणालीमध्ये होत असलेला बॅकअप व्यवस्थित होत आहे याची खात्री करणे तसेच तो परत जतन करताना व्यवस्थित जतन होईल का याचीही पडताळणी करणे गरजेचे आहे.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com