मोटो एक्स 4 आज होणार लॉन्च

वृत्तसंस्था
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

मोटो एक्स 4 स्मार्टफोनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मेटल बॉडी असलेल्या या स्मार्टफोनच्या अंतर्गत सिस्टीममध्ये, दोन व्हॉइस आभासी सहाय्यक, गुगल सहाय्यक आणि अॅमेझॉन अलेक्सा यांचा समावेश केला गेला आहे.

मोटोरोला एक्स 4 स्मार्टफोन आज (सोमवार) भारतात लॉन्च होणार असून, नवी दिल्लीत मोटोरोलाकडून आयोजित कार्यक्रमात हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. 

मोटो एक्स 4 स्मार्टफोनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मेटल बॉडी असलेल्या या स्मार्टफोनच्या अंतर्गत सिस्टीममध्ये, दोन व्हॉइस आभासी सहाय्यक, गुगल सहाय्यक आणि अॅमेझॉन अलेक्सा यांचा समावेश केला गेला आहे. होम बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला असून त्यात एक यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक आहे. 

या स्मार्टफोनची नोगट 7.1 ही नवीन ऑपरेटींग सिस्टीम (OS) आहे. तर 5.2-इंच आयपीएस एलसीडी (1080x1920 पिक्सेल्स) रिजोल्यूशन स्क्रिन देण्यात आली आहे. स्क्रिनची डेनसिटी 424 पीपीआई इतकी असेल. 2.2 गीगाहर्ट्स स्नॅप्ड्रॅगन 630 चिपसेट दिली आहे. तसेच फ्लॅश सपोर्ट, एफ/2.0 एपार्चर, 1-मायक्रॉन पिक्सेल आणि ड्युअल ऑटो फोकससह 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनला देण्यात आला आहे. ज्यात अनुकूलतेनुसार कमी प्रकाश मोड, सेल्फी पॅनोरामा, फेस फिल्टर आणि व्यावसायिक मोड यांसारखे वैशिष्ट्य दिसतील. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरीमध्ये सध्या हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. मायक्रो एसडी कार्डांद्वारे स्टोरेज 2 टीबीपर्यंत विस्तारित करता येईल. स्मार्टफोनची बॅटरी 3000mah नॉन-रिमोट यूएसबी केबल आहे. भारतीय बाजारापेठेत मोटो एक्स4 ची किंमत 23,999 पर्यंत असण्याची शक्यता आहे.