शंभर पट गती वाढवणाऱ्या 'वाय-फाय'चा शोध

पीटीआय
रविवार, 19 मार्च 2017

लंडन - सध्या अस्तित्वात असलेल्या वाय-फाय पद्धतीपेक्षा शंभर पट अधिक क्षमता असलेल्या वाय-फायचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. या वाय-फाय अधिक डिव्हाईसेसला जोडण्याची क्षमता असून त्यातून मानवी आरोग्याला कोणताही धोका नसल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.

कमी वेगाच्या वाय-फाय आपणा साऱ्यांना त्रास होतो. त्यातून अधिक डेटा जातो. हा प्रत्येकाचा अनुभव आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. एंडहोवॅन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍नॉलॉजीने या वाय-फायचा लावला आहे. ही नवी पद्धत अत्यंत साधी, सोपी आणि स्वस्त आहे. या पद्धतीद्वारे डिव्हासेस कनेक्‍ट करण्यासाठी प्रकाशाचा वापर अँटेना म्हणून करण्यात येतो. त्यामुळे कोणतेही डिव्हाईस अगदी सहजपणे कनेक्‍ट करता येऊ शकतात, असा दावा संशोधकांनी केला आहे. प्रतिसेकंद 40 गेगाबाईटस्‌ एवढी या वाय-फायची क्षमता असणार आहे.

डिव्हाईस कनेक्‍ट करण्यासाठी सुरक्षित इन्फ्रारेड तरंग (वेव्हलेंथ) वापरण्यात आल्याने त्याचा मानवी डोळ्यांच्या पडद्यावर कोणताही विपरित परिणाम होणार नसल्याचे संशोधकानी म्हटले आहे. युजरला कनेक्‍ट केलेल्या प्रकाशाच्या किरणापासून जर वाय-फायचा डिव्हाईस दूर नेला, तर वाय-फाय पोचत असलेल्या ठिकाणावरील प्रकाशाचे किरण डिव्हाईस कनेक्‍ट करण्यासाठी वापरले जातील. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय युजर कनेक्‍ट राहू शकेल, असा दावाही संशोधकांनी केला आहे. प्रकाशाचा किरणाचा वापर हा केवळ माहिती डाऊनलोड करण्यासाठी केला जाईल. तर अपलोडिंगसाठी पारंपारिक रेडिओ सिग्नलचाच वापर करण्यात येईल, असेही या संशोधनात म्हटले आहे.