एकच भाषा बोलणाऱ्यांची निर्णयक्षमता चांगली 

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

एकापेक्षा अधिक भाषा बोलण्याचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत. आजच्या काळात मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषा शिकणे गरजेचेही बनले आहे. मात्र केवळ एकच भाषा बोलणाऱ्यांची निर्णयक्षमता दोन किंवा अनेक भाषा बोलणाऱ्यांपेक्षा अधिक चांगली असते. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे अंतर्ज्ञानही अधिक असते, असा निष्कर्ष केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी काढला आहे. हे संशोधन"कॉग्निशन' या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. एकच भाषा बोलणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या कामगिरीचे अधिक चांगले मूल्यांकन करू शकतात, असा संशोधकांचा दावा आहे.

एकापेक्षा अधिक भाषा बोलण्याचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत. आजच्या काळात मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषा शिकणे गरजेचेही बनले आहे. मात्र केवळ एकच भाषा बोलणाऱ्यांची निर्णयक्षमता दोन किंवा अनेक भाषा बोलणाऱ्यांपेक्षा अधिक चांगली असते. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे अंतर्ज्ञानही अधिक असते, असा निष्कर्ष केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी काढला आहे. हे संशोधन"कॉग्निशन' या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. एकच भाषा बोलणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या कामगिरीचे अधिक चांगले मूल्यांकन करू शकतात, असा संशोधकांचा दावा आहे. मानसिक चाचण्यांमध्ये द्विभाषिक लोक एक भाषा बोलणाऱ्यांवर नेहमीच मात करीत असल्याने संशोधकही या निष्कर्षामुळे आश्‍चर्यचकित झाले आहेत. संशोधकांनी दोन आणि एक भाषा बोलणाऱ्या प्रत्येकी 31 जणांची संगणकीय चाचणी घेतली. त्यांना संगणकाच्या पडद्यावर दोन वर्तुळे दाखविण्यात आली. प्रत्येक वर्तुळात काही बिंदू 
होते. सहभागींना कुठल्या वर्तुळात अधिक बिंदू आहे, हे ओळखण्यास सांगितले. या वेळी एक भाषा बोलणाऱ्यांनी दुसऱ्या गटापेक्षा 10 टक्के अधिक अचूक उत्तरे दिली. संशोधक  डॉ. रॉर्बोटो फिलिपी म्हणाले,""दोन भाषा बोलण्याचे फायदे असून, त्यामुळे निर्णयक्षमता विकसित होत असल्याचा समज आहे. आमच्या संशोधनाचे निष्कर्ष मात्र या पूर्वीच्या संशोधनापेक्षा वेगळे आहेत. आम्ही याबाबत अधिक सखोल संशोधन करत आहोत.'' 

टॅग्स