सॅमसंगचा नवा स्मार्टफोन Z4 लवकरच भारतात

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

सॅनफ्रान्सिस्कोमध्ये येत्या आठवड्यात होत असलेल्या टायझन डेव्हलपर परिषदेत झेड4 चे सादरीकरण होणार आहे. स्मार्टफोन पहिल्यांदाच खरेदी करणारे ग्राहक डोळ्यासमोर ठेवून झेड4 ची निर्मिती केली आहे. 4जी, ४.५ इंचाची स्क्रिन, १.५ गीगा हर्ट्झ क्वाड कोअर प्रोसेसर आणि १ जीबी रॅम ही झेड4 फोनची वैशिष्ट्ये आहेत. मोबाईलला ५ मेगा पिक्सलचा कॅमेरा आहे. 

सॅमसंगचा सलग चौथा स्मार्टफोन झेड4 येत्या महिनाभरात भारतात दाखल होत आहे. टायझन ३.० या ऑपरेटिंग सिस्टिमवर हा मोबाईल वापरता येईल. सॅमसंगने अद्याप या फोनची किंमत घोषित केलेली नाही, मात्र फोन काळा, सोनेरी आणि चंदेरी रंगात उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे. 

सॅनफ्रान्सिस्कोमध्ये येत्या आठवड्यात होत असलेल्या टायझन डेव्हलपर परिषदेत झेड4 चे सादरीकरण होणार आहे. स्मार्टफोन पहिल्यांदाच खरेदी करणारे ग्राहक डोळ्यासमोर ठेवून झेड4 ची निर्मिती केली आहे. 4जी, ४.५ इंचाची स्क्रिन, १.५ गीगा हर्ट्झ क्वाड कोअर प्रोसेसर आणि १ जीबी रॅम ही झेड4 फोनची वैशिष्ट्ये आहेत. मोबाईलला ५ मेगा पिक्सलचा कॅमेरा आहे. 

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या मोबाईल कम्युनिकेशन बिझनेसचे अध्यक्ष डी जे कोह यांनी सांगितले, की टायझनच्या विस्तारासाठी झेड4 स्मार्टफोन उपयुक्त ठरणार आहे. 'हा स्मार्टफोन वापरायला अतिशय सोपा असेल. पहिल्यांदा स्मार्टफोन घेणाऱया ग्राहकांना तो निश्चित चांगला अनुभव देईल,' असेही कोह यांनी सांगितले. 

गुगल अँड्रॉईडच्या झंझावतापुढे अन्य ऑपरेटिंग सिस्टिम्स बाजूला फेकल्या जात असताना सॅमसंग स्वतःची टायझन ऑपरेटिंग सिस्टिम भक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्यावर्षीच्या एप्रिलमध्ये सॅनफ्रान्सिस्को येथे सॅमसंग डेव्हलपर्स परिषदेत टायझनची घोषणा केली गेली होती. लिनक्सवर आधारित टायझन ऑपरेटिंग सिस्टिम सॅमसंगच्या स्मार्ट टीव्ही आणि स्मार्ट घड्याळांसाठीही वापरली जावी, असा सॅमसंगचा प्रयत्न आहे.