आता ट्विटरवरही लाइव्ह स्ट्रिमिंगची सुविधा

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

न्यूयॉर्क: माध्यमांना थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रिमिंग) करणे सुलभ व्हावे, तसेच युजर्सनाही लाइव्ह व्हिडिओ ट्विटरवर टाकता यावेत, यासाठी ट्विटर "लाइव्ह व्हिडिओ एपीआय' आणणार आहे. यामुळे कंपन्यांना उच्चदर्जाचे प्रक्षेपण करणे शक्‍य होणार असून, या लाइव्ह स्ट्रिमिंगला टीव्हीप्रमाणे जाहिरातीही असल्याने ट्विटरलाही फायदा होणार आहे.

फेसबुक लाईव्हला मिळणारी वाढती पसंती पाहून आता ट्विटरनेही लाइव्ह स्ट्रिमिंग देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. व्यावसायिक माध्यमांना सोशल मीडियाशी कनेक्‍ट करण्यासाठी ही सुविधा देण्यात येणार असून हे फेसबुक लाईव्हप्रमाणेच काम करेल. ट्विटरने नुकतेच "ईएसएल' आणि "ड्रीमहॅक' या प्रोग्रामिंग क्षेत्रातील बड्या कंपन्यांसोबत भागीदारी केली असून त्यांच्या मदतीनेच हे नवे फिचर ट्विटर आणणार असल्याचे समजते.