'व्हॉटसऍप' डिजीटल पेमेंट क्षेत्रात उतरणार?

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - लोकप्रिय मेसेंजर ऍप 'व्हॉटसऍप' डिजीटल पेमेंट क्षेत्रात उतरण्याची शक्‍यता व्हॉटसऍपचे सहसंस्थापक ब्रायन ऍक्‍टॉन यांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - लोकप्रिय मेसेंजर ऍप 'व्हॉटसऍप' डिजीटल पेमेंट क्षेत्रात उतरण्याची शक्‍यता व्हॉटसऍपचे सहसंस्थापक ब्रायन ऍक्‍टॉन यांनी व्यक्त केली आहे.

ऍक्‍टॉन हे नुकतेच भारत भेटीवर आले होते. त्यावेळी त्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. व्हॉटसऍपवर स्टेटस देण्याच्या नव्या पद्धतीबाबत बोलताना ते म्हणाले, 'मी आणि जान यांनी यापूर्वीच स्टेटसमध्ये आपण बदल करावेत याबाबत चर्चा केली होती. मात्र आमचे प्राधान्यक्रम वेगळे होते. त्यामुळे यावर काम करायला आम्हाला वेळ लागला. आम्ही सादर केलेल्या स्टेटसच्या नव्या पद्धतीला सकारात्मक प्रतिक्रिया मिळालेल्या नाहीत. मात्र याबाबत एवढ्यात कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही.'

फेसबुकने व्हॉटसऍप विकत घेतलेल्या व्हॉटसमध्ये गुंतवणूक वाढली आणि त्यात आवश्‍यक ते बदल वेगाने करता आले, असेही ऍक्‍टॉन यांनी सांगितले. युक्रेनमध्ये जन्मलेल्या जान कोम यांच्यासोबत ऍक्‍टॉन यांनी 2009 साली व्हॉटसऍपची स्थापना केली. मागील महिन्यातच व्हॉटसऍपने आपला आठवा जन्मदिन साजरा केला आहे. व्हॉटसऍपचे जगभरात एकूण 1 अब्ज 20 कोटी युजर्स आहेत. तर एकट्या भारतामध्ये 20 कोटी युजर्स आहेत.

साय-टेक

आज जागतिक छायाचित्र दिवस. जगभरातल्या फोटोग्राफर्सना प्रेरणा देणारा दिवस. मोबाईलच्या युगानंतर फोटोग्राफी प्रत्येकाच्या हातात आलीय...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 मध्ये तब्बल 6 जीबी 'रॅम' असेल, असे समजते आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची चाचणी घेणाऱया Geekbench या...

शनिवार, 12 ऑगस्ट 2017

वनप्लस (OnePlus) ब्रँडचे मोबाईल हँडसेट वापरणाऱयांसाठी महत्वाची बातमी. आपले वनप्लस3 आणि वनप्लस3टी या मोबाईलवर अँड्रॉईड ओ नंतर...

शनिवार, 12 ऑगस्ट 2017