नाशिक - शेतकऱ्याच्या मिरचीला दीड रुपया भाव

receipt
receipt

तताणी (नाशिक) : उन्हाळी मीरचीला मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. बागलाण तालुक्यातील आदिवासी पश्चिम भागातील तताणी येथील पंडित ठाकरे या शेतकऱ्याने आपल्या शेतात नवल पी.एम. ह्या प्रजातीच्या मिरची पिकाची लागवड मल्चींगच पेपर वापरून केली आहे. शेत तयार करण्यासाठी ट्रॅक्टरचा खर्च, ठिबक, जमीनीत टाकण्यासाठी खते, मीरची चे रोप, तसेच दिवसाआड दिले जाणारे खते, फवारणीचे औषधे, तार, बांबु, दोरी, मजुर आणि पाणी ईतर खर्चाचा बोजा पाहता कवडीमोल बाजारभावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

सद्य परिस्थितीत मिरचीची काढणी चालु असुन बाजारात अत्यल्प बाजार भावाने विकावी लागत आहे. खर्चही निघणार नसल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवार (ता.15) रोजी मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची विकण्यासाठी पाठवली असता दिड रूपये प्रति किलो दराने भाव मिळाला.

एका बॅगचे वजन 20 किलो.एकुन 26 बॅग विकण्यासाठी मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विकण्यास पाठवले असता.20कीलोची मिरचीची बॅग(पाऊच) 30 रू प्रमाणे विकली गेली.सरासरी दिड रूपये प्रति किलो भाव मिळाला.यातुन एकुण रक्कम 780 रुपये झाली .यामधुन हमाली,वाराई,94रू वाहण भाडे 1040 खर्च वजा जाता शेतकर्याकडे 354 रू बाकी निघाली. याव्यतीरीक्त शेतात मिरची काढण्यासाठी 12मजुरांचे 200 रू प्रमाणे 2400 रू मजुरी तसेच 26 रिकाम्या बॅगचा खर्च 130 रू.असे एकुण 
 2884 उलट शेतकर्याकडुण देणे आहे याला "आमदाणी आठ्ठणी खर्चा रूपया"असे म्हणावे लागेल.

मिरची पिकाला रोजच्या रोज पाणी आणी एक दोन दिवसाआड ठिबकमधुन  महागडी खते द्यावी लागत आहेत तसेच वेळोवेळी औषधाची फवारणी देखील करावी लागत आहे.मातीमोल बाजारभावामुळे खर्च करावे कि नाही हा प्रश्न शेतकर्यांपुढे ठाकतो आहे.परंतु आज ना उद्या भाव मिळेल ह्या भाबड्या  आशेवर राहुन उधारीने का होईना खर्च करत आहे.आत्ता पिक तरी कुठले करावे सुचत नाही. कारण हीच परिस्थीती कोबी आणी टोमॅटो पिकांची देखील झाली आहे.कोबीला देखील एक ते दीड रूपये प्रति किलो दराने भाव मिळत आहे.खर्चही निघत नसल्याने उभ्या पिकात नांगर धरत आहेत.उभ्या पिकावर टॅक्टरचे रोटर फिरविणेही अवघड झाले आहे.खते आणी औषधांच्या उधारीने मात्र दुकानदारांची वहीची पाणे भरली आहेत.उधारी कशी फेडायची याची चिंता पडली आहे  .बाजारातून घरी मात्र दमडीही शिल्लक येत नाही यालाच का" अच्छे दिन" म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे 

  " शेतकरी नवनविन तंत्रज्ञान वापरून वेगवेगळी पिके घेत आहे. यामुळे पारंपारीक शेती पेक्षा अधिक खर्च होत आहे मात्र  शेतकर्याला कुठल्याच पिकातुन पैसे मिळत नाहीत.पिके तरी घ्यायची कुठली कारण अत्यल्प  बाजार भाव हिच मुख्य समस्या निर्माण झाली आहे.
- पंडित ठाकरे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com