एकाच परिवारातील १२ डॉक्‍टरांची जन्मभूमीत रुग्णसेवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

‘डॉक्‍टर आपल्या गावी’ उपक्रम, तितुर येथील शिबिरात ४५० जणांची तपासणी 
भडगाव - तितुर (ता. सोयगाव) येथे एकाच परिवारातील १२ डॉक्‍टरांनी आपल्या जन्मभूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करीत ‘डॉक्‍टर आपल्या गावी’ हा आगळा वेगळा उपक्रम राबविला. स्वर्गीय सोभागचंदजी ओस्तवाल यांच्या २७ व्या स्मृती दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेऊन गरजूंना औषधी वाटप करण्यात आले.

४५० जणांची तपासणी 
आपण आपल्या जन्मभूमीचे देणे लागतो, या भावनेतून ओस्तवाल कुंटुबातील डॉक्‍टरांनी तितुर (ता. सायगाव) येथे आरोग्य शिबिर घेतले.

विशेष म्हणजे एकाच कुंटुबातील १२ डॉक्‍टरांनी शिबिरात रुग्णांची तपासणी केली. कायमस्वरूपी वैद्यकीय सेवा पुरविण्याचा मनोदय डॉ. अशोक ओस्तवाल यांनी यावेळी व्यक्त केला. शिबिरात मुंबई, अमळनेर, नाशिक, औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले डॉक्‍टर उपस्थित होते. ओस्तवाल परीवाराकडून भडगावात स्मृती दिनानिमित्त २६ वर्षांपासून मोफत शिबिराचा उपक्रम राबविणारे डॉ. अशोक ओस्तवाल, डॉ. मोतीलाल ओस्तवाल यांनी आपली परंपरा कायम ठेवत या शिबिराचे आयोजन केले होते. डॉ. प्रकाश ओस्तवाल अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रा. कवरलाल ओस्तवाल, डॉ. पारसमल ओस्तवाल, सरोज ओस्तवाल, प्रिया ओस्तवाल, सरपंच सुनील माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. रोकडे यांनी सूत्रसंचालन तर राजेश कुचेरिया यांनी आभार मानले. राहुल ओस्तवाल यांनी औषधांचे वाटप केले. शिबिरासाठी औषधी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, भडगाव वैद्यकीय संघटना व जैन नवयुवक मंडळाचे सहकार्य लाभले. 

जन्मभूमीसाठी काढला वेळ
जन्मभूमी असलेल्या तितुर गावी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासाठी एकाच कुटुंबातील १२ डॉक्‍टरांनी वेळ दिला. त्यात डॉ. पारसमल ओस्तवाल (अमळनेर), डॉ. मोतीलाल ओस्तवाल (भडगाव), डॉ. प्रकाश ओस्तवाल, डॉ. चेतन ओस्तवाल (कळवा), डॉ. मनोज ओस्तवाल (औरंगाबाद), डॉ. अशोक ओस्तवाल (भडगाव), डॉ. प्रीतेश ओस्तवाल (पुणे), डॉ. प्रमोद ओस्तवाल (चाळीसगाव), डॉ. प्रेमचंद ओस्तवाल (विरार मुंबई), डॉ. विजय सुराणा (नाशिक), डॉ. आरती सुराणा (नाशिक), डॉ. सुमतिलाल जैन (मुंबई) हे सहभागी झाले होते.