'जलयुक्त' शिवार अभियानात धुळे जिल्ह्यातील 163 गावांचा समावेश

jalyuktashivar
jalyuktashivar

धुळे : राज्यशासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गेल्या वर्षी जिल्ह्यात 95 गावांची निवड झाली होती. निवड झालेल्या बहुतेक गावांत लोकसहभाग आणि शासन यंत्रणेने प्रभावीपणे राबविलेल्या योजनेमुळे जलस्तर उंचावण्यास मदत झाल्याचे चित्र आहे. या अभियानांतर्गत यंदा जिल्ह्यातील 163 गावांचा समावेश करण्यात आला असून निवड झालेल्या सर्व गावांतील ग्रामस्थांमध्ये शासकीय यंत्रणेतर्फे होणाऱ्या कामांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यात अनेक गावांमध्ये लोकसहभाग घडवून प्रशासनासह बळ दिले जाणार आहे. शेवाळी-दा.(ता.साक्री)येथील ग्रामस्थांनी लोकसहभाग घडविण्याचा निश्चय केला आहे. यंदा साक्री तालुक्यात 72, धुळे 41, शिरपूर 31 तर शिदंखेडा तालुक्यातील 19 गांवाचा समावेश आहे.

जिल्ह्यात यंदा अनेक पाणी टंचाई आहे.2015 पासून राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. दरवर्षी निवड झालेल्या गावात कृषी, वन, जिल्हा परिषदेचा लघु सिचंन, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे, पंचायत समिती व सामाजिक संस्थाकडून जलस्तर उचांवण्याच्या उद्देशाने कामे केली जातात. त्यामुळे बहुतेक गावांतील पाण्याची पातळी वाढल्याचे चित्र आहे. यात काळगा (ता.साक्री) गावांत लोकसहभाग व जलयुक्त शिवार अभिनयामुळे पाणी प्रश्न कमी झाला. गेल्या चार वर्षापासूनच्या या अभियानामुळे आदिवासी पश्चिम जलस्तर वाढला आहे.

आदिवासी भागात मिळालेल्या लोकसहभागामुळे अभियानाला बळ मिळाले आहे. यंदा 163 गांवातील ग्रामस्थांत अभियानाबाबत सकारात्मक वाढली असून काही गांवानी लोकसहभाग देण्याचे निश्चित केले आहे.

शेवाळीत लोकसहभागाचे बळ!
दरम्यान,पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या शेवाळी गावाचा जलयुक्तमध्ये समावेश झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह  संचारला आहे. सामाजिक जपणूक करणारे ग्रामस्थ लोकसहभाग घडवतील अशी माहिती युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायतीचे सदस्य प्रदिपकुमार नांद्रे यांनी 'सकाळ' ला दिली. वनक्षेत्र वा शेतशिवारातले वाहून जाणारे पाणी अडविले तर हमखास टंचाई कमी होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे.

जलयुक्त शिवार अभियानामुळे यंदा रब्बी पेरणी वाढ झाली. गेल्या वर्षी सुमारे नव्वद हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पेरणी झाली होती.यंदा एक लाख तीस हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पेरणी झाली.तसेच कांदा लागवडीत झाल्याने यंदा चौदाशे कांदा चाळीसाठी अनुदान देण्यात आले, असे कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी सांगितले. 

यावर्षी जिल्ह्यात निवड झालेली गावे  
साक्री -

आयणे, अंबापूर, आमखेल, बागूलनगर, बासर, भोरटीपाडा, ब्राह्मणवेल, बुरुडखे,दापूर,देवजीपाडा,देवळीपाडा,धाडणे,धंगाई,ढोलीपाडा,डोगंरपाडा,गगांपूर,गोदांस,गुलतारे,हनुमंतपाडा.हट्टी.बु.,होडदाणे,ईच्छापूर,जामकी,कैलासनगर,कंळभीर,करझंटी,खैरखुटा,कोकले,कुहेर,लघळवाळ,लखाळे,लव्हारदोडी,लोणखेडे,मालखेडे,मापलगाव,मावजीपाडा,नागझीरी,नागपूर,नादरंखी,नवडणे,नवेनगर,पंचमौली,फोफरे,पिजांरझाडी,रायकोट,रायतेल,राझणंगाव,रोहण,रोजगाव,रुनमळी,सय्यदनगर,शेलबारी,शेवाळी(दा.),शिरसोले,शिवाजीनगर,शिवरीमाळ,सुतारे,तामसवाडी,तोरणकुडी,उंभड,उमरपाटा,वाजदरे,वर्धाने,वरसुस,वासखेडी,झीरणी,कालटेक,पांगण,विटावे,इसर्डे,जामदे,पन्हाळीपाडा.

धुळे -
देऊर बु.,देऊर खु.,दिवाणमाळ,दोदंवाड,बांबुर्ले प्र.नेर,कुलथे, लोहगड, लोणखेडी,महाल- कंदमाणा,कासद,लोंढा,पंढरी,न्याहल रायवट,नवे कोठरे,पिंपरखेडे,तामसवाडी,रावेर,सावळदे,तिखी,उंभड,उडाणे,वणी बु.,वणी
खु.,आर्वी,बाभुळवाडी,बिलाडी,काळखेडे,कुंडाणे(वरखेडे),मलाणे,नंदाणे,नवलनगर,नावरी,निमखेडी,सोनगीर,सुकवद,वजीरखेडे,वरखेडे,विश्वनाथ,वडेल,वडगाव,फागणे.

शिरपूर -
अभणपूर बु.,अजंणपाडा,अंतुर्ली,अर्थे खु., बाभुळदे, बाळदे, भिलारदेवपाडा, भोईटी,धवळीविहीर,फाॅरेस्ट,गॅप,गिधाडे, हिगोणी बु., जवखेडे,खर्दे बु.,खर्दे खु.,लोदंणारे,महादेव दोदंवाडे, माळपूर(अनेरडॅम), ममाणे, पाथर्दे, रोहिणी, साकवद, सावळदे, तोंदे, उखळवाडी, उटांवद,उप्परखिंड,वडले खु.वरुळ,वरवाडे.

शिदंखेडा -
कदाणे,महालपूर,रुदाणे,सावळदे,दाऊळ,रामी,टाकरखेडे,अंजदे बु.,अक्कडसा,
अक्कलकोस,भिलाणे(डी.),कलवाडे,पढावद,परसोळे,पिंप्राड,सार्वे,सोंडले,सोनेवाडी,वरवाडे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com