नाशिकला नव्या चलनातील 30 लाखांची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नाशिक - जुन्या चलनातील नोटा बदलून देण्याच्या गोरखधंद्यातील दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा असलेली 30 लाख रुपयांची रोकड नाशिक पोलिसांनी सापळा रचून जप्त केली. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांना ताब्यात घेतले.

नाशिक - जुन्या चलनातील नोटा बदलून देण्याच्या गोरखधंद्यातील दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा असलेली 30 लाख रुपयांची रोकड नाशिक पोलिसांनी सापळा रचून जप्त केली. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांना ताब्यात घेतले.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून काळा पैसा असलेल्या जुन्या नोटा बदलून देण्यासाठीचा गोरखधंदा सध्या देशभर तेजीत असून, त्याचे लोण नाशिकपर्यंत पोचले आहे. 20 ते 25 टक्के कमिशनच्या मोबदल्यामध्ये नोटा बदलून दिल्या जात असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने वडाळागावात रविवारी मध्यरात्री सापळा रचला. खासगी चालक शिक्षक असद जाकीय सय्यद (29, रा. वडाळागाव) यास अटक केली. त्याच्याकडून नव्या दोन हजार रुपयांच्या चलनातील 17 लाख रुपये जप्त केले आहेत.

याचप्रमाणे गंगापूर रस्त्यावर रविवारी (ता.18) दुपारी पोलिसांनी सापळा रचला. तिघे जण नोटा बदलून देण्यासाठी आल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. रोशन घन:श्‍याम वालेचा (26, रा. पंचवटी), गोरख महादू गोफणे (46, रा. डाऊच, कोपरगाव), सयाजाद अब्दुल रहेमान मोटवाणी (35, रा. वडाळा रोड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकहून दोन हजार रुपयांमधील 13 लाख रुपये जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी प्राप्तिकर विभागालाही कळविले आहे.

उत्तर महाराष्ट्र

धुळे (म्हसदी)  : वीज वितरण कंपनीचा भोगंळ कारभार सर्वश्रुत आहे.वेळेवर बिल न येणे, बिल वाढीव येणे असे प्रकार नेहमी घडतात....

09.09 AM

देऊर : नेर (ता. धुळे) येथे चौदाव्या व्या वित्त आयोग निधितून 42 सिमेंट कॉंक्रीट बसण्याचे बाक आणि दोन शवपेटी यांचे लोकार्पण नुकतेच...

08.57 AM

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने यंदा संलग्न महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळेतील एम. एस्सी. प्रवेशासाठी प्रथमच केंद्रीय...

02.18 AM