स्टेट बॅंकेकडे वितरणासाठी 310 कोटींचे चलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नाशिक - स्टेट बॅंकेकडे सध्या 310 कोटींचे चलन उपलब्ध असून, आगामी काळात चलनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अडीचशे कोटी रुपयांच्या पाचशे व शंभराच्या नोटांची मागणी रिझर्व्ह बॅंकेकडे नोंदविण्यात आली आहे.

नाशिक - स्टेट बॅंकेकडे सध्या 310 कोटींचे चलन उपलब्ध असून, आगामी काळात चलनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अडीचशे कोटी रुपयांच्या पाचशे व शंभराच्या नोटांची मागणी रिझर्व्ह बॅंकेकडे नोंदविण्यात आली आहे.

सध्या ग्रामीण भागासाठी 260 कोटी व शहरासाठी 50 कोटी रुपये उपलब्ध आहेत. पुढील आठवड्यात चलनपुरवठा सुरळीत होण्यासाठी तातडीने अडीचशे कोटी रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पाच कोटी रुपयांच्या पाचशेच्या नव्या नोटा बॅंकेला उपलब्ध झाल्या आहेत. परंतु त्या ठराविक बॅंकांनाच मिळाल्या होत्या. पाचशे व शंभराच्या अडीचशे कोटी रुपयांच्या नोटा चलनात उपलब्ध झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील चलनटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. सध्या एटीएममध्ये पैसे टाकले जातात. मात्र दोन हजारांच्या नोटा एक-दीड तासातच संपतात, तर शंभराच्या नोटा जमा होताच काढण्यासाठी गर्दी होत आहे.