बनावट कर्जप्रकरण करून ५९ लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

नाशिक - बनावट कर्जप्रकरण करून बॅंक खात्यांत फायनान्स कंपनीकडून तब्बल ५९ लाख तीन हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

नाशिक - बनावट कर्जप्रकरण करून बॅंक खात्यांत फायनान्स कंपनीकडून तब्बल ५९ लाख तीन हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

अविनाश केशव कुलकर्णी (रा. कलानगर, इंदिरानगर), असे संशयिताचे नाव असून, औरंगाबाद येथील जहिरोद्दीन बी. शेख (वय ३५) यांच्या फिर्यादीनुसार संशयित कुलकर्णी नोव्हेंबर २०१५ ते ऑक्‍टोबर २०१६ दरम्यान गंगापूर रोडवरील थत्तेनगरच्या बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयात नोकरीला होता. त्याने बजाज फायनान्स कंपनीच्या १७ जुन्या ग्राहकांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. त्या कागदपत्रांच्या आधारे त्याने त्यांची बॅंक खाती सुरू केली. बजाज फायनान्स कंपनीत त्या ग्राहकांच्या नावे बनावट कर्जप्रकरण करून ५९ लाख तीन हजारांचा अपहार केला. या संदर्भात गंगापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.  

Web Title: 59 lakh fraud

टॅग्स