अद्यापही 60 टक्के एटीएम बंदच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नाशिक - नोटाबंदीच्या निर्णयानंतर 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून आउट ऑफ सर्व्हिस असलेले राष्ट्रीय व खासगी बॅंकांचे एटीएम यंत्र महिन्यानंतरही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. शहर-जिल्ह्यात सुमारे 930 एटीएम असून, यापैकी 40 टक्के एटीएम सुरू आहेत, उर्वरित 60 टक्के एटीएम तांत्रिक दोषामुळे बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ठराविक बॅंकांच्या एटीएमसमोर दोन हजाराच्या एका नोटेसाठी तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद ठरविल्यानंतर गेल्या महिनाभराच्या काळातील परिस्थिती अद्यापही "जैसे थे'च आहे. नवीन दोन हजाराची नोट चलनात आणली असली, तरी तिचा वापर एटीएम मशिनमध्ये करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकांना तब्बल दोन आठवड्यांचा कालावधी लागला. जिल्ह्यातील 60 टक्के एटीएममध्ये अद्यापही तांत्रिक बदल न करण्यात आल्याने ते एटीएम बंदस्थितीत आहेत. स्टेट बॅंकेच्या एटीएममधूनच दोन हजाराची नोट येते.