राज्यात तीन महिन्यांत स्वाइन फ्लूने 83 रुग्ण दगावले 

राज्यात तीन महिन्यांत स्वाइन फ्लूने 83 रुग्ण दगावले 

नाशिक - राज्यात गेल्या वर्षी स्वाइन फ्लूने 26 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यंदा तीन महिन्यांत 83 जण दगावले आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये सहा, तर यंदा 12 मृत्यू झाले आहेत. या महिन्यात पुण्यात चार, नाशिकमध्ये तीन, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अमरावती, नागपूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. कमाल आणि किमान तापमानातील फरक दहा अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याने इन्फ्लुएंझा आर.एन.ए. विषाणूला पोषक ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. 

गेल्या तीन महिन्यांत दगावलेल्यांमध्ये नाशिकमधील 18, पुण्यातील 11 व जिल्ह्यातील नऊ, पिंपरी-चिंचवडमधील आठ, औरंगाबाद आणि नगरमधील प्रत्येकी सहा, कोल्हापूरमधील चार, सोलापूर, सातारा, अमरावतीमधील प्रत्येकी तीन, परभणी, लातूर, नागपूरमधील प्रत्येकी दोन व उस्मानाबाद, धुळे, सांगली, जालना, बुलडाण्यामधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी नुकतीच पुण्यात ससूनमध्ये आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर राष्ट्रीय प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांशी चर्चा केली. राज्यात यंदा तीन महिन्यांत 353 रुग्णांना विषाणूची लागण झाली आहे. आरोग्य विभागातर्फे 20 हजार 280 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. 

हिवाळा आणि पावसाळ्यात इन्फ्लुएंझाचे रुग्ण वाढत असताना यंदा वैशाख वणवा पेटलेला असताना रुग्णांची संख्या कशी वाढली, असा प्रश्‍न सामान्यांमध्ये तयार झाला आहे. त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून माहिती घेतल्यावर कमाल आणि किमान तापमानातील फरकामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असताना प्रतिकारशक्ती कमी होऊन स्वाइन फ्लूची लागण होण्यासाठी पूरक परिस्थिती तयार होत असल्याचे कारण पुढे आले आहे. 

नाशिक जिल्ह्याची स्थिती 
वर्ष रुग्ण मृत्यू 
2009 122 22 
2010 254 39 
2011 16 1 
2012 37 21 
2013 34 19 
2014 22 10 
2015 508 87 
2016 16 4 
2017 47 18 

(मृतांची संख्या ः बागलाण- 3, चांदवड- 1, सिन्नर आणि निफाड- प्रत्येकी 2, नाशिक- 1, नाशिक महापालिका- 4, भगूर नगर परिषद- 2) 
(16 ते 25 वर्षे वयाची एक तरुणी, 26 ते 35 वयोगटातील एक महिला, 36 ते 45 वयोगटातील तीन पुरुष व दोन महिला, 46 ते 55 वर्षे वयोगटातील चार पुरुष व एक महिला, 55 ते पुढील वयोगटातील तीन पुरुष व तीन महिला दगावल्या आहेत.) 

हे करावे हे करू नये 
-सातत्याने साबण व स्वच्छ पाण्याने हात धुणे. - हस्तांदोलन टाळावे. 
-पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे. - सार्वजनिक ठिकाणी थंकू नये. 
-लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या - डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. 
अशा आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा. - आपल्याला फ्लूसदृश लक्षणे असल्यास गर्दीच्या 
-धूम्रपान टाळावे व पुरेशी झोप-विश्रांती घ्यावी. ठिकाणी जाणे टाळावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com