'आसिफा अत्याचार व खून प्रकरणातील आरोपींना फाशी द्या'

प्रा. भगवान जगदाळे
बुधवार, 25 एप्रिल 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : जम्मू काश्मीरमधील कठुआ गावातील आसिफा बानो सामूहिक अत्याचार प्रकरण व खूनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यातील सर्व आठही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय निषेध मुकमोर्चा काढून आज (बुधवार) अकराच्या सुमारास निजामपूर-जैताणेतील मुस्लिम समाजातर्फे साक्रीचे तहसीलदार संदीप भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मुस्लिम कार्यकर्त्यांनी निजामपूर ते साक्रीपर्यंत १०० मोटारसायकलींची रॅलीही काढण्यात आली होती.

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील आसिफाबानो नामक आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर आठ संशयित नराधमांनी सलग ५/६ दिवस अतिशय निर्दयीपणे, क्रूरपणे सामूहिक अत्याचार करुन व उपाशी ठेऊन तिच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या काही जातीयवादी व धार्मिक संघटनांसह, पाठबळ देणाऱ्या मंत्र्यांवर व सदर केस चालविण्यास विरोध दर्शविणाऱ्या बार कौन्सिलच्या वकिलांवरही देशद्रोहाचा खटला चालविण्यात यावा. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निषेध मुकमोर्चात उन्नाव, सुरत, दोंडाईचा, कठुवा, कोपर्डी, यमुनानगर आदी ठिकाणच्या सर्व अत्याचार, बलात्कार व खुनाच्या घटनांचाही निषेध नोंदविण्यात आला.

निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य सलीम पठाण, जाकीर तांबोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष पोपटराव सोनवणे, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, लियाकत सय्यद, खुदाबक्ष शेख, लियाकत तांबोळी, साजिद पठाण, अनिस पठाण, युसूफ सय्यद, सादिक टेलर, नासिर सर, आवेश सय्यद, राजू खान, आमीन मण्यार, अकबर सय्यद, मन्ना सय्यद, आकीब सय्यद, सादिक तांबोळी, बबलू शेख आदींसह मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: aasifa murder case hang the accused