जामनेरला वनकर्मचाऱ्यांवर हल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

जामनेर: खडकी-बोरगाव शिवाराच्या (ता. जामनेर) वनविभागातील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांवर हल्ला करुन वाहन जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर: खडकी-बोरगाव शिवाराच्या (ता. जामनेर) वनविभागातील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांवर हल्ला करुन वाहन जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्‍ताईनगर रेंज व खडकी बोरगाव शिवारातील कंपार्टमेंट नंबर 589 मध्ये 0.40 हेक्‍टर जमीनीवर अतिक्रमण करुन गहू पिकाची पेरणी करण्यात आली होती. या वनविभागातील जमिनीवरचे अतिक्रमण काढण्यासाठी वरिष्ठांच्याआदेशाने बोदवड राऊंडचे वनपाल के. एम. वराडे यांच्यासह 21 कर्मचारी गेले होते. यावेळी गहू पिकावर रोटर फिरवल्याचा राग आल्याने 7 आरोपींनी वनविभागाच्या कर्मचारी व वाहनावर रॉकेल फेकले व पेटवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर दगडफेक करुन वाहनाची तोडफोड केली व हल्ला केला.

या कारणावरुन फिर्यादी उमाकांत नवल कोळी (रा. खोटेनगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रमेश अनन मोरे, माणिक जंगलू गायकवाड (रा. गाविदबाबा, बोदवड रोड, जामनेर) यांच्यासह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक माधुरी बोरसे करीत आहे.

अतिक्रमण काढायला गेलेल्या पथकात के. एम. वराडे, डी. एम. कोळी, एम. डी. कुवर (सर्व वनपाल), यु. एन. कोळी (वनरक्षक), विकास पाटील, चंदू पाटील, सचलाल पवार, अण्णा काटे यांच्यासह कर्मचारींचा समावेश होता.

 

टॅग्स

उत्तर महाराष्ट्र

चिमूर : तालुक्‍यातील हळद उत्पादकांना नावीन्यपूर्ण सुधारित हळद लागवड कार्यक्रमांतर्गत प्रोत्साहन म्हणून मिळणारे अनुदान काजळसर...

07.51 PM

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : 'अवाज वाढव डीजे,' 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याने ग्रामीण भागात धुम केली आहे. मात्र आता डीजेचा आवाज...

07.03 PM

जळगाव: लोकशाहीतील भविष्य असलेल्या युवकांचा मतदानासाठीचा उत्साह, उमेदवारांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची लगबग, मतांसाठी प्रचाराची...

06.45 PM