भगूर पालिकेत भगव्या वादळामुळे भाजप, राष्ट्रवादी आघाडी भुईसपाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

देवळाली कॅम्प - जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भगूर पालिकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीत झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या भगव्या वादळामुळे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी भुईसपाट झाली. शिवसेनेने नगराध्यक्षांसह 16 जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवून पालिकेवर पुन्हा भगवा फडकविला.

देवळाली कॅम्प - जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भगूर पालिकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीत झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या भगव्या वादळामुळे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी भुईसपाट झाली. शिवसेनेने नगराध्यक्षांसह 16 जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवून पालिकेवर पुन्हा भगवा फडकविला.

शिवसेनेचे उमेदवार विजयी होताच मतमोजणी केंद्राबाहेर भगवे ध्वज, "शिवसेना झिंदाबाद', "विजय करंजकर आगे बढो'च्या घोषणा देण्यात आल्या. फटाक्‍यांच्या आतषबाजीने परिसर दणाणला होता. भगूरमध्ये समर्थकांनी गुलालाची उधळण करीत शिवसेनेच्या विजयाचा जल्लोष केला. निवडणुकीत कॉंग्रेसचे मोहन करंजकर एकमेव उमेदवार विजयी झाले.
भगूर पालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला विहितगाव येथील माऊली समाजमंदिराच्या सभागृहात सकाळी दहाला निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरवात झाली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार राजश्री आहिरराव, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर उपस्थित होते. मतमोजणीसाठी आठ टेबल लावण्यात आले होते. सुरवातीपासूनच शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. दोन फेऱ्यांत आघाडी कायम राहिली. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांनी तेथून काढता पाय घेतला. दोन फेऱ्यांतील निकाल अवघ्या 20 मिनिटांत जाहीर झाल्याने मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण, फटाक्‍यांची आतषबाजी करीत शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. "शिवसेना झिंदाबाद', "उद्धव ठाकरे आगे बढो, विजय करंजकर आगे बढो'च्या घोषणांनी परिसर दणाणला होता. निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी मतमोजणी शांततेत पार पाडल्याबद्दल उमेदवार, कार्यकर्ते व पोलिसांचे आभार मानले.

मतमोजणीसाठी नायब तहसीलदार नरेंद्र वाघ, अरुण शेवाळे, पंकज पवार, जगदीश पाटील व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

भगूरमधील शिवाजी चौकात नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उमेदवारांचे फटाक्‍यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे आमदार योगेश घोलप, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शिवाजी सहाणे, निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शिवसेना कार्यकर्ते व नागरिकांचे आभार मानून भगूरच्या विकासाची घोडदौड सुरूच राहील, असे सांगितले.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थितीमुळे स्थानिक बाजारपेठेतील कांद्याच्या भावात क्विंटलला सहाशे रुपयांनी घसरण झाली होती....

02.48 AM

जळगाव - एमआयडीसीच्या जमिनीबाबत 1995च्या परिपत्रकाची स्थिती काय, असे वारंवार विचारल्यानंतर अखेरीस सरकारने हे परिपत्रक नुकतेच...

12.18 AM

सोनगीर (धुळे): सोनगीरला उद्यापासून ग्राहक कार्यकर्ता राज्यस्तरीय प्रबोधन अभ्यासवर्ग होत आहे. यातून दोन दिवस (ता. 19 व 20)...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017