शेतकरी-लोकप्रशासनात मोठी दरी - श्रीमंत माने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

सटाणा - प्रशासकीय अधिकारी आपल्या मातीच्या व्यथा विसरत असल्याने लोकप्रशासनाची नाळ सामान्य माणसाशी तुटत चालली आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा बधिर प्रशासनास समजत नसून शेतकरी व लोकप्रशासनात मोठी दरी तयार झाली आहे. अशा अधिकाऱ्यांना देवमामलेदारांच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांच्यावर सामाजिक व नैतिक जबाबदारी टाकण्याचे काम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी येथे केले.

सटाणा - प्रशासकीय अधिकारी आपल्या मातीच्या व्यथा विसरत असल्याने लोकप्रशासनाची नाळ सामान्य माणसाशी तुटत चालली आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा बधिर प्रशासनास समजत नसून शेतकरी व लोकप्रशासनात मोठी दरी तयार झाली आहे. अशा अधिकाऱ्यांना देवमामलेदारांच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांच्यावर सामाजिक व नैतिक जबाबदारी टाकण्याचे काम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी येथे केले.

येथील राधाई मंगल कार्यालयात न्यूज मराठी वृत्तवाहिनीतर्फे ‘राज्यस्तरीय देवमामलेदार यशवंत गौरव पुरस्कार’ वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून श्री. माने बोलत होते. प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्रबापू पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्षा निर्मला भदाणे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे, देवमामलेदार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. विजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार विश्‍वास चंद्रात्रे, किशोर भांगडिया आदी प्रमुख पाहुणे होते. श्री. माने म्हणाले, ‘‘कुटुंब एकत्रित राहणे ही काळाची गरज असून, एकत्रित असलेली कुटुंबेच मोठी होत असतात.

देवमामलेदारांसारख्यांचा लोकोत्तर वारसा श्रद्धेने जपण्याचे काम सटाणा शहरवासीय करीत आहेत. राममंदिर, बाबरी मशीद, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याऐवजी शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी व पर्यावरण या देशाच्या प्रमुख समस्या आहेत.’’ 

वर्षा उसगावकर म्हणाल्या, ‘‘प्रत्येक माणसाला स्वप्न बघण्याचा अधिकार असतो. मात्र ते साकार करण्याचे प्रयत्न केले जात नाहीत. चित्रपटात काम करताना सुंदरता टिकवून ठेवणे हे खरे आव्हान असून, नेहमी सुंदर दिसणे अजिबात सोपे नाही. अभिनेत्री प्रेक्षकांसाठी नटी असली तरी कॅमेरा हा तिचा प्रियकर असतो.’’

डॉ. विजय सूर्यवंशी (सचिव, संरक्षण राज्यमंत्री, भारत सरकार), नरेंद्र पाटील (मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई), चित्रा बाविस्कर (नगरसचिव, नवी मुंबई महापालिका) यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देवमामलेदार यशवंत गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘आय न्यूज’चे संस्थापक देवेंद्र वाघ यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत पुरस्कार देण्याचा उद्देश स्पष्ट केला. यश कॉम्प्युटर्सतर्फे घेण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या चिमुकल्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. 

कार्यक्रमास मविप्रचे माजी संचालक प्रमोद पाटील, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. दिलीप शिंदे, प्राचार्य डॉ. एस. जी. बाविस्कर, डॉ. किरण अहिरे, डॉ. दिग्विजय शहा, शंकर सावंत, पोलिस निरीक्षक बशीर शेख, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, नगरसेवक नितीन सोनवणे, दिनकर सोनवणे, महेश देवरे, मनोहर देवरे, डॉ. विद्या सोनवणे, संदीप सोनवणे, बाबाजी पाटील, ‘साहित्यायन’चे सचिव प्रा. बी. डी. बोरसे, यशवंत अमृतकार, लक्ष्मण मांडवडे, डॉ. प्रकाश जगताप, दिनेश गुंजाळ, भाऊसाहेब अहिरे, डॉ. रमण सुराणा, डॉ. अशोक सुराणा, भारत कोठावदे, अशोक शिंदे, लालचंद सोनवणे, शरद शेवाळे, बी. व्ही. देवरे, ए. बी. भामरे, नंदकिशोर शेवाळे, गोरख बच्छाव, जितेंद्र गोसावी, संदीप जगताप, किरण सोनवणे, पंकज सोनवणे आदी उपस्थित होते. प्रा. बी. जे. शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जितेंद्र मेतकर व पूजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.