कामांच्या खासगीकरणाचा भाजपचा सपाटा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

नाशिक - महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे कारण देत शहरात अपूर्ण राहिलेले रिंगरोडसह उद्याने, क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती खासगीकरणातून करण्याच्या सूचना महापौर रंजना भानसी यांनी बांधकाम विभागाच्या बैठकीत दिल्या. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर खासगीकरणाचा ठपका ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने खासगीकरणाच्या दिशेने जोरदार आगेकूच सुरू केल्याचे आज स्पष्ट झाले. विशेष म्हणजे खासगीकरणाचे प्रस्ताव 15 दिवसांत सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

महापौर कार्यालयात आज बैठक झाली. या बैठकीत सौ. भानसी यांनी तातडीने मार्गी लागणाऱ्या कामांचा आढावा घेतला. शहर अभियंता यू. बी. पवार यांनी अपूर्ण रिंगरोड पूर्ण करताना महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून दिल्याने ही कामे खासगीकरणातून मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. रिंगरोडचा अहवाल सादर करावा, शहरातील डेब्रीज हटवावा, त्यासाठी स्वतंत्र उपअभियंत्यांची नियुक्ती करावी, उत्पन्नाचे स्रोत शोधावे, क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅक, उद्यानांचा विकास खासगीकरणासह सामाजिक दायित्वातून करता येईल का, याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना महापौर भानसी यांनी दिल्या. महाविद्यालये, दवाखाने असलेल्या भागातील रस्त्यांवर गतिरोधक तयार करण्याबरोबरच पांढरे पट्टे मारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्त्यावरील ढापे वर आल्याने अपघात होतात. त्यामुळे भर काढून समपातळीत (लेव्हल) करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. उपमहापौर प्रथमेश गिते यांनी जॉगिंग ट्रॅकवर सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या. या वेळी भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर उपस्थित होते. 

Web Title: BJP work in the private sector