पिंप्री खुर्दला बैलगाडी विहीरीत पडल्याने दोघा बैलांचा मृत्यू 

भगवान पाटील
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पिंप्री खुर्द (ता पाचोरा )येथील साहेबराव सुकदेव पाटील यांनी बैलगाडीत ठिबकच्या नळ्याचे बंडल ठेवून शेताकडे निघाले. शेतातील विहीरीजवळ अचानक बैल भडकले व विहिरीच्या दिशेने पळत सुटले.

निंभोरी (ता. पाचोरा) : पिंप्री खुर्द ( ता पाचोरा ) येथील ठिबक च्या नळ्या भरलेल्या  बैलगाडी चे बैल भडकल्याने बैलगाडी विहिरीत पडुन बैलजोडी मरण पावल्याची घटना पिंप्री शिवारात घडली असुन 75  हजार रुपयाचे  नुकसान झाले.

याबाबत सविस्तर माहिती आशी की, पिंप्री खुर्द (ता पाचोरा )येथील साहेबराव सुकदेव पाटील यांनी बैलगाडीत ठिबकच्या नळ्याचे बंडल ठेवून शेताकडे निघाले. शेतातील विहीरीजवळ अचानक बैल भडकले व विहिरीच्या दिशेने पळत सुटले. बैलगाडी विहिरीत जाऊन पडली. यात दोन्ही बैल विहिरीत पडल्याने मरण पावले.

या घटनेत शेतकरी साहेबराव पाटील बचावले. शेतकऱ्यांचे सुमारे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी तलाठी श्वीमती चौधरी यांनी पंचनामा केला.

Web Title: bull drown in well pachora

टॅग्स