युवा उद्योजक पाटील यांना कंबोडियात विशेष पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

पुरस्कार हा चांगल्या कामाचा, उद्योग भरभराटीला आणण्याचा व मजुरांशी सामाजिक भावनेतून वागण्यासाठीचा सन्मान असतो. मार्केटिंगमध्ये विविध स्पर्धा सुरू झाल्या आहेत. त्यात गुणवत्तापूर्ण व्यवहारच भरभराटीस येऊ शकतो

कापडणे - धुळे शहरातील युवा नेते आणि सिद्धी मोटर्सचे मालक उत्कर्ष पाटील यांना कंबोडियात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऑल इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद के. अग्रवाल, कंपनीचे हेवी कमर्शिअल मोटर्स इंडियाचे मुख्य एस. एस. गिल, लाइट ड्यूटी व्हेईकल इंडियाचे मुख्य श्‍याम मल्हारा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला.

श्री. पाटील यांच्या या सन्मानाबद्दल प्राचार्य प्रमिला पाटील, डॉ. आशिष पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील व जवाहर परिवारातर्फे समाधान व्यक्त होत आहे. "पुरस्कार हा चांगल्या कामाचा, उद्योग भरभराटीला आणण्याचा व मजुरांशी सामाजिक भावनेतून वागण्यासाठीचा सन्मान असतो. मार्केटिंगमध्ये विविध स्पर्धा सुरू झाल्या आहेत. त्यात गुणवत्तापूर्ण व्यवहारच भरभराटीस येऊ शकतो,' असे श्री. पाटील यांनी सांगितले.