व्यापाऱ्यानेच लुटीचा रचला बनाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नाशिक - लासलगाव येथे गेल्या सोमवारी ऍक्‍सिस बॅंकेतून 9 लाखांची रोकड काढल्यानंतर चारचाकीतून निघालेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पुड फेकली आणि दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रोकडची बॅग नेल्याची घटना घडली. स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने तपास करीत सदरील लुटीचा बनाव व्यापारी राहुल सानप यानेच चौघांच्या मदतीने केल्याची उकल केली आहे. बॅंकेच्या आतील व बाहेरील सीसीटीव्हीतील हालचाली व संशयित व्यापाऱ्याच्या फोन कॉल्स डिटेल्सवरून संशयित अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
Web Title: businessman loot bogus planning