सवलतीमुळे वाहन खरेदीसाठी ‘उड्या’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

जळगाव - ‘बीएस-३’ वाहन बंद होणार असल्याचा निर्णय बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर बुधवारी बहुतांश कंपन्यांनी जुन्या वाहनांवर पाच हजार ते तीस हजारांपर्यंतची सवलत जाहीर केली. त्यामुळे शहरात जणू सवलतीमुळे वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी उड्या असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोपेड व बाईक या गाड्यांवर परिणाम झाला आहे. असे असले तरी बहुतांश चारचाकी वाहने ‘बीएस-४’ प्रणालीतील असल्याने या वाहनांना निर्णयाचा फटका बसणार नाही.

जळगाव - ‘बीएस-३’ वाहन बंद होणार असल्याचा निर्णय बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर बुधवारी बहुतांश कंपन्यांनी जुन्या वाहनांवर पाच हजार ते तीस हजारांपर्यंतची सवलत जाहीर केली. त्यामुळे शहरात जणू सवलतीमुळे वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी उड्या असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोपेड व बाईक या गाड्यांवर परिणाम झाला आहे. असे असले तरी बहुतांश चारचाकी वाहने ‘बीएस-४’ प्रणालीतील असल्याने या वाहनांना निर्णयाचा फटका बसणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने देशभरात बीएस-३ मानक असलेल्या वाहनांच्या विक्री आणि नोंदणीवर बंदी आणली आहे. हा निर्णय १ एप्रिलपासून लागू होणार असून यानंतर भारतात फक्त बीएस-४ उत्सर्जन मानक असलेल्या वाहनांचीच विक्री व नोंदणी होणार असल्याने गाड्यांच्या डिलर्सने गाड्यांवर मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज शहरातील सर्वच डिलर्सकडे गाड्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

जुन्या गाड्यांची तोट्यात विक्री
केंद्र सरकारने बीएस-४ इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहे त्यामुळे जुन्या बीएस-३ च्या गाड्या कंपन्यांनी तोटा सहन करत विक्रीस काढल्या आहेत. १ एप्रिलनंतर या उर्वरित गाड्या भंगारमध्ये जाणार असल्याने दुचाकी कंपन्यांचे नुकसान होणार असल्याची माहिती वाहन विक्रेत्यांनी दिली. 

ग्राहकांचा गोंधळ
इतक्‍या वर्षात प्रथमच व दोन दिवसच गाड्या खरेदीवर सवलत मिळत असल्याने ग्राहकांनी गुरुवारी गाड्या खरेदीसाठी शो-रुम वर गोंधळ केला. तर काही नागरिकांनी ऑफिस सुटल्यावर परस्पर दुकान गाठले होते. त्यामुळे दिवसभर गाड्या खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल दिसून आली.

दुकानदारांकडे वेळच नाही
गाड्या खरेदीसाठी ग्राहकांनी इतकी गर्दी केली होती दुकानदारांकडे बोलायला देखील वेळ नव्हता. आजपर्यंत एखाद्या सणावाराला ही इतकी गाड्यांची बुकिंग झाली नव्हती तितकी बुकिंग आज एका दिवसात पाहायला मिळाला. प्रत्येक शो-रुम किमान शंभर गाड्यांची आज बुकिंग झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

पंधरा हजारांपर्यंत सवलत
शहरातील विविध गाड्यांच्या डिलर्सने ३१ मार्चपर्यंतच्या खरेदीवर डिस्काऊंट दिला आहे. यात पंकज ऑटोतर्फे बाईकवर पाच हजारांपासून तर वीस हजारांपर्यंत डिस्काऊंट दिला गेला आहे. सोबत इन्शुरन्स देखील मोफत देण्यात आला आहे. सातपुडा ऑटोतर्फे मोपेड गाड्यांवर १४ हजार रुपयांपर्यंत तर बाईकवर १० हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात आला आहे. तर रामहोंडातर्फे पाच हजारांपासून ३० हजारांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.

दोन दिवस गाड्यांवर मोठ्या प्रमाणावर सवलत दिल्याने गर्दी झाली आहे मात्र आम्ही फक्त इन्शुरन्स काढून जरी रजिस्ट्रेशन केले तरी चालणार आहेत.
- योगेश चौधरी (संचालक, पंकज ऑटो)

न्यायालयाच्या निर्णयानंतर गुरुवारपासून आम्ही दुचाकीवर सवलत दिल्याने आज दिवसभरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. शेवटी सायंकाळी गर्दीमुळे दुकान बंद करावे लागले.
- आदित्य जाखेटे (संचालक, रामहोंडा)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बीए-३ मानक असलेली वाहने रद्द ठरणार आहेत. ३१ मार्चपूर्वी वाहन खरेदी करण्याचा पुरावा सादर केल्यास त्याच वाहनांची नोंदणी केली जाईल. पुराव्यासाठी अर्ज क्र.२१, इनव्हॉइस बिल, विमा प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ग्राह्य मानली जातील. 
- जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

आज शेवटचा दिवस
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दोन दिवसच बीएस-३ गाड्या विक्री करता येणार असल्याने उद्या (ता.३१) गाड्या विक्रीसाठी शेवटचा दिवस आहे. या पार्श्‍वभूमीवर वाहन विक्रेत्यांना उद्यासाठी आणखी काही नवीन योजना व सवलती काढल्या असून उद्या अधिक वेळ दुकाने उघडे असणार आहेत. 

Web Title: Buy discount per vehicle