सेटिंग बदलासाठी एटीएम सेवा बंदच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नाशिक - नागरिकांची नोटा बदलण्यासाठी धावाधाव सुरू असताना शहरातील बहुतांश एटीएम तांत्रिक दुरुस्तीसाठी बंद असल्याने नागरिकांची गैरसोय आणखी वाढली आहे. तांत्रिक सुधारणा करून एटीएम सेवा सुरळीत करण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. 

नाशिक - नागरिकांची नोटा बदलण्यासाठी धावाधाव सुरू असताना शहरातील बहुतांश एटीएम तांत्रिक दुरुस्तीसाठी बंद असल्याने नागरिकांची गैरसोय आणखी वाढली आहे. तांत्रिक सुधारणा करून एटीएम सेवा सुरळीत करण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. 

पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दोन दिवस एटीएम बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. शुक्रवार (ता. 11)पासून एटीएम सेवा सुरळीत होणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी एटीएम सेवा बंद राहिली. बॅंक शाखांद्वारे शंभरच्या नोटांचे वाटप केले जात असल्याने एटीएमसाठी नोटा भरणा थांबला होता. बॅंकांच्या शाखालगतचे एटीएमवगळता शहरातील बहुतांश एटीएम बंद होते. 
नवीन नोटा उपलब्ध करून देण्यासाठी एटीएम मशिनच्या सेटिंगमध्ये बदलाचे काम सध्या सुरू आहे. येत्या आठवडाभरात तांत्रिक दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन एटीएम सेवा सुरळीत होईल, असे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तांत्रिक दुरुस्ती झाली तरी नोटांच्या उपलब्धतेवर एटीएम सेवा अवलंबून राहणार आहे. 

एक हजारवर एटीएम दुरुस्तीचे आव्हान 
जिल्ह्याची अग्रणी बॅंक असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शहरात 90, तर स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे 130, तसेच अन्य राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंका मिळून शहरात सुमारे एक हजारावर एटीएम मशिनमध्ये सेटिंग बदलावे लागणार आहे. बॅंकांसमोरील गर्दी कमी करण्यासाठी एटीएम सेवा सुरळीत होणे आवश्‍यक आहे. 

सीडीएम मशिनचा वापर जोरात 
एटीएम सुविधा बंद असली तरी कॅश डिपॉझिट मशिनचा उपयोग वाढला आहे. बॅंका व मोठ्या एटीएम मशिनच्या नजीक असलेल्या या मशिनमध्ये जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी गर्दी होत आहे. 

आमच्या बॅंकेच्या एटीएमच्या तांत्रिक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या आठवडाभरात एटीएम सेवा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. नागरिकांनी गोंधळून न जाता आवश्‍यक तेवढी रक्‍कमच खात्यातून काढावी. 
- चंद्रशेखर रेखी, सहाय्यक महाप्रबंधक, बॅंक ऑफ इंडिया

उत्तर महाराष्ट्र

सोनगीर (धुळे) - दहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे येत्या चार - पाच महिन्यांत उद्घाटन होईल, ...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : येथील पोलिस ठाण्यात नुकतीच शांतता समिती व गणेश मंडळांच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली. सहाय्यक...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

धुळे : देऊर परिसरातील भारतीय जीवन विमा निगम ग्राहकांनी सर्व प्रकारच्या  नवीन पाॅलीसी ची माहितीसह, जुन्या पाॅलिसींची...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017