नाशिककरांना मिळणार आता पुराचे ‘अपडेट’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

नाशिक - गोदावरी, वालदेवी व नासर्डी नदीला वारंवार पूर येत असल्याने काठावरील नागरिकांना सतर्क करण्यासाठी महापालिकेतर्फे ॲप विकसित केले जाणार आहे. त्याद्वारे नागरिकांची वित्त व जीवितहानी वाचविण्याचा उद्देश आहे. ॲपमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून केलेल्या उपाययोजनांची माहितीही मिळणार असून, त्यामुळे नागरिकांना स्वत:हून कार्यवाही करण्यास मदत होणार आहे.

नाशिक - गोदावरी, वालदेवी व नासर्डी नदीला वारंवार पूर येत असल्याने काठावरील नागरिकांना सतर्क करण्यासाठी महापालिकेतर्फे ॲप विकसित केले जाणार आहे. त्याद्वारे नागरिकांची वित्त व जीवितहानी वाचविण्याचा उद्देश आहे. ॲपमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून केलेल्या उपाययोजनांची माहितीही मिळणार असून, त्यामुळे नागरिकांना स्वत:हून कार्यवाही करण्यास मदत होणार आहे.

गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी, नासर्डी, वालदेवी व वाघाडीला महापूर आला होता. त्यातून आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून तत्काळ सूचना पोचल्याने नदीकाठच्या नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान टळले. सध्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून उपाययोजना केली जाते. मात्र, मानवी पद्धतीने होणाऱ्या उपाययोजनांमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात वेळ व पैसा खर्च होत असल्याचा निष्कर्ष निघाल्याने नागरिकांना सूचना देण्यासाठी ॲप विकसित करण्याचा निर्णय झाला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जसा होईल, तसेच उपनद्यांची पातळी जशी वाढेल त्याप्रमाणे ॲपद्वारे नागरिकांना माहिती मिळणार आहे. वाढत्या पाण्यामुळे कुठला भाग बाधित होईल, किती कुटुंबांचे स्थलांतर होईल, नदीकाठच्या नागरिकांची माहिती, त्यांचे क्रमांक, पुनर्वसन केंद्र, वैद्यकीय व आरोग्य सेवेची  माहिती अॅपद्वारे नागरिक व अधिकाऱ्यांना प्राप्त होईल. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी, डॉक्‍टरांचे भ्रमणध्वनी क्रमांक त्यात असतील. नदीकाठच्या झोपडपटट्या, दुकानांसाठी ॲप फायदेशीर ठरणार आहे.

लघुसंदेशाद्वारे माहिती

१ ते ३ ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधारेने गंगापूर धरणातून पाण्याचा किती विसर्ग झाला. ठराविक क्‍यूसेक पाणी सोडल्यानंतर पाणी कुठपर्यंत पोचले होते. अधिक पाणी सोडल्यानंतर पाणी कुठपर्यंत पोचले होते, याचे प्रथम रेखांकन केले जाणार आहे. रेखांकनाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये त्या आकडेवारीचा समावेश केला जाणार आहे. झोपडपड्डीमधील प्रत्येक नागरिकाकडे स्मार्टफोन असेलच असे नाही, ही बाजू समजून घेत नागरिकांच्या मोबाईल क्रमांकाचा ॲप्लिकेशनमध्ये समावेश होणार आहे. लघुसंदेशाच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत पूरपरिस्थितीची माहिती पोचणार असल्याचे महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्र

दिवाळीनंतरच्या लग्नसराईत दिसणार परिणाम नाशिक - देशभरातील करप्रणालीत एकसंघपणा यावा म्हणून केंद्र शासनाने १ जुलैपासून देशात...

12.00 PM

इगतपुरी - गेल्या चार दिवसांपासून शहरासह तालुक्‍यात सुरू असलेल्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. समाधानकारक पावसामुळे...

12.00 PM

नाशिक - राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत नाशिकमध्ये मालमत्ता व पाणीपट्टीचे दर कमी आहेत. त्यात वाढ न करता नगरसेवकांच्या विकास...

11.12 AM