ग्राहकाभिमुख प्रकल्पांसाठी बांधिलकी

ग्राहकाभिमुख प्रकल्पांसाठी बांधिलकी

मुंबईतील महाविद्यालयातून 2007 मध्ये सुवर्णपदकासह वास्तुविशारद पदवी मिळवली. त्यानंतर "सराफ आर्किटेक्‍ट ऍण्ड असोसिएट्‌स‘च्या माध्यमातून प्रत्येक प्रकल्प अधिकाधिक ग्राहकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विविध ठिकाणी कामाचा अनुभव घेत निवासी व संस्थात्मक प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर टेक्‍सासमधील मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीए केले. पत्नी पूनम सराफ याही वास्तुविशारद असून, त्यांच्यासह कमर्शियल व रेसिडेन्सियलसह हॉटेलच्या प्रकल्पावर कामे सुरू आहेत. सांगताहेत, युवा वास्तुविशारद पुनित सराफ.

या क्षेत्राची आवड आधीपासूनच होती. त्यामुळे याच क्षेत्रात करिअर करण्याचा ध्यास होता. त्यानुसार मुंबईतील "रचना संसद अकादमी‘ या प्रथितयश वास्तुविशारद महाविद्यालयातून पदवी घेतल्यावर या क्षेत्रातील दीर्घकालिन उद्दिष्ट निश्‍चित केले. त्यानंतर मुंबईतील वास्तुविशारद राहुल गोरे, सोनल संचेती यांच्याबरोबर काम सुरू केले. तत्पूर्वी, 2008 मध्ये टेक्‍सासमधून बांधकाम व्यवस्थापनशास्त्रात उच्च श्रेणीतून एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केला. 

त्यानंतर नाशिकला आल्यावर वास्तुविशारद असलेली पत्नी पूनम सराफबरोबर "सराफ आर्किटेक्‍ट आणि असोसिएट्‌स‘च्या माध्यमातून कामे सुरू केली. त्यानंतर पहिलाच प्रकल्प म्हणून मनजीत धुप्पर कुटुंबीयांच्या आठ एकरच्या फार्म हाउसचे काम हाती घेतले. या प्रकल्पासाठी गंगापूर धरणाचा परिसर किंवा चामरलेणीचा डोंगर परिसर या दोन्ही ठिकाणांपैकी एकाची निवड करायची होती. त्यानंतर दुगाव परिसरातील आठ एकरच्या रम्य टेकडीवर हा छोटेखानी बंगला उभा केला. यात नैसर्गिक प्रकाश मिळण्यासाठी जास्तीत जास्त स्कायलाइटचा वापर केला. सुरवातीला संबंधितांना एकाच रूमची आवश्‍यकता होती. त्यानुसार वर्तमान व भविष्याचा विचार करून हे बांधकाम पूर्ण केले. सध्या हॉटेल, कमर्शियल व रेसिडेन्सियल बिल्डिंगचे काम सुरू आहे. संस्थेतून दर्जेदार कामांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे. तसेच, यापुढे जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकामे उभी करण्याचा मानस आहे.

(शब्दांकन ः दत्ता जाधव) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com