पहिली व्हिकेट मुक्ताईनगर तलाठ्याची

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

मुक्ताईनगर - अधिकार नसताना निवडणूक नायब तहसीलदाराने कलम ८५ अन्वये चक्क जमिनीची वाटणी आदेश काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर तालुक्‍यातील पहिली विकेट आज पडली. या प्रकरणी तलाठी मिलिंद देवरे यांना निलंबित करण्याचे आदेश भुसावळच्या प्रांताधिकारी दिले आहेत. आता त्यांच्यानंतर या प्रकरणात कोणावर कारवाई होते, या भीतीने संबंधित अन्य कर्मचाऱ्यामध्ये धांदल उडाली आहे.

मुताईनगरला तहसीलदारांच्या अपरोक्ष वाटणी आदेश काढणारे नायब तहसीलदार बी. आर. नमायते, फेरफार नोंद टाकणारे मंडळ अधिकारी आर. एम. फारुखी, तलाठी मिलिंद देवरे यांच्या विरुद्ध जितेंद्र सावळे यांनी तक्रार केली होती. त्यामुळे हे गंभीर प्रकरण उघडकीस आले होते. या बाबत तहसीलदारांनी गंभीर पाऊल उचलून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. दरम्यान, या प्रकरणात भुसावळ प्रांताधिकारी यांनी तलाठी देवरे यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करीत निलंबित केले आहे.

पोलिसात गुन्हे
या प्रकरणी तलाठी देवरे यांनी तक्रारकर्ता जितेंद्र सावळेसह त्याच्या कुटुंबातील ४ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा व मारहाण करण्याबाबत गुन्हा दाखल केला होता; तर जितेंद्र सावळे यांनीदेखील न्यायालयात प्रकरण दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने नायब तहसीलदार नमायते, मंडळ अधिकारी फारुखी, तलाठी देवरे यांचा विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

उत्तर महाराष्ट्र

धुळे (म्हसदी)  : वीज वितरण कंपनीचा भोगंळ कारभार सर्वश्रुत आहे.वेळेवर बिल न येणे, बिल वाढीव येणे असे प्रकार नेहमी घडतात....

09.09 AM

देऊर : नेर (ता. धुळे) येथे चौदाव्या व्या वित्त आयोग निधितून 42 सिमेंट कॉंक्रीट बसण्याचे बाक आणि दोन शवपेटी यांचे लोकार्पण नुकतेच...

08.57 AM

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने यंदा संलग्न महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळेतील एम. एस्सी. प्रवेशासाठी प्रथमच केंद्रीय...

02.18 AM