जिल्ह्यात 26 शाळा, 70 तुकड्यांना अनुदान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

धुळे - जिल्ह्यातील वीस टक्‍के अनुदानास पात्र झालेल्या 26 शाळा व 70 तुकड्यांना पुण्यातील शिक्षण संचालक स्तरावरून मंजुरी मिळाली. याबाबत वेतनासंबंधी माहितीही वेतन पथक अधीक्षकांना पाठविण्यात आली. 2015- 2016 च्या संचमान्यतेनुसार मान्यताप्राप्त पदांना वेतन मिळेल. यात सात उर्दू व 19 मराठी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. 

धुळे - जिल्ह्यातील वीस टक्‍के अनुदानास पात्र झालेल्या 26 शाळा व 70 तुकड्यांना पुण्यातील शिक्षण संचालक स्तरावरून मंजुरी मिळाली. याबाबत वेतनासंबंधी माहितीही वेतन पथक अधीक्षकांना पाठविण्यात आली. 2015- 2016 च्या संचमान्यतेनुसार मान्यताप्राप्त पदांना वेतन मिळेल. यात सात उर्दू व 19 मराठी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. 

मार्च 2014 ते जून 2016 पर्यंत अनुदान घोषित झालेल्या शाळांना वीस टक्‍के अनुदान देण्यासंदर्भात 19 सप्टेंबर 2016 ला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात निर्णय झाला. त्यानुसार निकष पूर्ण करणाऱ्या विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्‍त शिक्षकांना सप्टेंबर 2016 पासून वेतन मिळेल. नंतर दरमहा नियमित वेतन मिळेल. यासाठी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, उपशिक्षणाधिकारी डी. बी. पाटील व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. 

अनुदानप्राप्त शाळा 
शासन निर्णयाचा जिल्ह्यातील 27 पैकी 26 शाळा व 70 तुकड्यांना लाभ झाला आहे. त्यामुळे आठवी ते दहावीच्या 22 मुख्याध्यापक, 82 शिक्षक, 25 लिपिक, 49 शिपायांना वीस टक्‍के वेतनाचा लाभ मिळेल. त्या शाळा अशा ः नूतन हायस्कूल (कापडणे), व्ही. डब्ल्यू. एस. हायस्कूल (धुळे), अजंदे, नेवाडे, जुनी सांगवी, तऱ्हाड कसबे, अकलाड, देगाव, झिरवे धावडे, रोहोड, कुंडाणे (वे. तांडा), घाणेगाव, उंभर्टी, पाचमौली येथील माध्यमिक विद्यालय, झेड. बी. पाटील माध्यमिक विद्यालय (धुळे), हाजी म. उस्मान मराठी माध्यमिक विद्यालय (धुळे), सिद्दीक उर्दू माध्यमिक विद्यालय, ज्ञानोपासक माध्यमिक विद्यालय (झिरवे धावडे), सरस्वती माध्यमिक विद्यालय (शिरपूर), विकास उर्दू माध्यमिक विद्यालय (नरडाणा), अल-फातेमा उर्दू हायस्कूल (धुळे), हबिबी फातेमा गर्ल्स हायस्कूल (शिरपूर), आनंदवन हायस्कूल (सोनगीर), शांताई माध्यमिक विद्यालय (पिंपळनेर), इंदिरा माध्यमिक विद्यालय (मांजरी). जखाणे येथील माध्यमिक विद्यालयाच्या प्रस्तावात त्रुटी आढळल्याने तो नामंजूर झाला. 

वीस टक्‍के अनुदानप्राप्तीसाठी कायम विनाअनुदानित माध्यमिक शाळांकडून प्रस्ताव मागविले. निकषांची पूर्तता, आरक्षण धोरणाचे पालन केलेल्या 2015- 2016 च्या संच मान्यतेनुसार मान्य व वैयक्‍तिक मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वीस टक्‍के वेतन मिळण्यासाठी त्यांनी सप्टेंबर 2016 ते जानेवारी 2017 पर्यंतची देयके वेतन पथक अधीक्षकांकडे जमा करावीत. 

- प्रवीण पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी 

Web Title: Dhule district 26 schools, 70 dividsion of grant