वस्तुनिष्ठ लेखा-जोखा सादर करा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

धुळे - महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आतापर्यंत झालेला खर्च व निधीची गरज याचा वस्तुनिष्ठ लेखा-जोखा सादर करावा, अशा सूचना महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक राजू सोळुंके यांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत. 

धुळे - महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आतापर्यंत झालेला खर्च व निधीची गरज याचा वस्तुनिष्ठ लेखा-जोखा सादर करावा, अशा सूचना महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक राजू सोळुंके यांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत. 

महापालिकेचे 2016-17 चे सुधारित व 2017-18 चे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. नोटाबंदीच्या काळात जमा रकमेचा सविस्तर लेखा-जोखा मांडण्याची कसरत पूर्ण झालेली नव्हती, त्यामुळे अंदाजपत्रक तयार करताना अडचणी येत होत्या. यासाठी लेखा विभागाने यापूर्वी महापालिकेतील सर्व विभागप्रमुखांना कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. विविध विभागांकडून वस्तुनिष्ठ जमा-खर्चाचा लेखाजोखा सादर न झाल्यानेही अंदाजपत्रक तयार करताना अडचणी येत आहेत. मुख्य लेखापरीक्षक सोळुंके काटेकोर व नियमानुसार अंदाजपत्रक तयार व्हावे यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे काल (ता.21) त्यांनी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली व 2016-17 च्या अंदाजपत्रकात विभागासाठी झालेली तरतूद, आतापर्यंत झालेला खर्च व पुढे लागणारी निधीची गरज याचा सविस्तर आणि वस्तुनिष्ठ लेखा-जोखा सादर करावा, आकडेवारी फुगवून सादर करू नये अशा सूचना दिल्या. मागील वर्षात प्रशासनाने अंदाजपत्रक सादर करण्यात आघाडी घेतली होती. यंदा मात्र याला काहीसा विलंब झाला आहे. विभागप्रमुखांकडून आकडेवारी सादर झाल्यानंतर अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाला गती येणार आहे. 

Web Title: dhule municipal corporation Submit audit objective