आखाडे येथील युवकाचा रत्नागिरीत अपघाती मृत्यू

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील आखाडे (ता. साक्री) येथील मूळ रहिवासी व रत्नागिरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या धीरज सुरेश ठाकरे (वय 27) याचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला.

रत्नागिरी येथे धीरज याचा मंगळवारी (ता.10) अपघात झाला होता. बुधवारी (ता.11) पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्याच्यावर आखाडे येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

धीरज हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा नुकताच मे महिन्यात शेवाळी (ता. साक्री) येथील युवतीशी विवाह झाला होता. धीरज हा येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा माजी विद्यार्थी होता. त्याचे एम. एस्सी. (ऍग्री.) पर्यंत शिक्षण झाले होते. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. धीरजच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.