धुळे: नेर येथे दोन शवपेट्यासह, 42 सिमेंट बाक

तुषार देवरे
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

"नेर गावात पाणी,भूमिगत गटार,सार्वजनिक स्वच्छता,दिवाबती,रस्ते,विकास कामासोबत नवनवीन संकल्पना अंमलात आणून गावात ग्रामपंचायती मार्फत विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे.त्याचाच एक भाग म्हणून 14 वा वित्त आयोग निधितून 42 सिमेंट कॉंक्रीट बाक आणि 2 शवपेटी यांचे लोकार्पण करण्यात आले.गावात विविध चौकात बसण्याची सोय त्यामुळे होणार आहे.त्याचप्रमाणे शवपेटी मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शव चांगल्या स्थितीत रात्रभर ठेवून सकाळी त्यावर अत्यंविधी करता येईल."
- शंकरराव खलाणे  सरपंच नेर ग्रामपंचायत (ता.धुळे)

देऊर : नेर (ता. धुळे) येथे चौदाव्या व्या वित्त आयोग निधितून 42 सिमेंट कॉंक्रीट बसण्याचे बाक आणि दोन शवपेटी यांचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

धुळे तालुक्यातील नेर गाव मोठे आहे. गावाची लोकसंख्या पंचवीस हजारापर्यंत आहे. गावात दुखःद घटना घडली तर, लांबवरून येणारे नातेवाईकांमुळे  उशीरा अंत्यसंस्कार करण्यासाठी समस्या येत होती. त्यासाठी शवपेटी आवश्यक होती.

त्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार मध्यप्रदेश येथून दोन शवपेट्या आणल्या आहेत. या शवपेट्यांमुळे मृतदेह उशीरा पर्यंत सुरक्षित ठेवता येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या व गावाच्या दृष्टीने महत्तवपूर्ण सोय झाली आहे. त्याचबरोबर गावात विविध चौकात जेष्ठ नागरिकांकडून वारंवार बसण्यासाठी  सिमेंट क्रांकिट बाकांची मागणी होत होती. त्या अनुषंगाने गावात एकुण 42 बाक आणले आहेत. नेर म्हसदी फाटा, मरिमाता चौक,महात्मा फुले चौक,गांधी चौक , तसेच  गावातील मुख्य चौकात हे बाक ठेवण्यात आले आहेत.त्यामुळे प्रवाशी किंवा स्थानिक जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सोय झाली आहे . लोकार्पण प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख मनिष जोशी,वसंत देशमुख,संजय कपुर , सरपंच शंकरराव खलाणे ,उपसरपंच दत्तात्रय सोनवणे सर्व ग्रामपंचायत सदस्य, नामदेव बोरसे, देविदास माळी,दिलीप कोळी,संतोष सोनवणे,सिद्धार्थ जैन ,पंकज वाघ,निर्मल आखाडे ,धर्मा आप्पा,दिनेश सोनवणे, संतोष खलाणे ,बापु कोळी,आदि ग्रामस्थ उपस्थित होते. शवपेटी व 42 सिमेंट बाकांमुळे महिलांची ही सोय झाली आहे. तनिष्का अध्यक्षा तथा माजी सरपंच मनिषा खलाणे, ज्योती कपूर, लक्ष्मीबाई माळी, डाॅ.अनघा जोशी, सुचेता जोशी, सिंधुबाई शिसोदे, विजया सोनवणे , विजया पाटील, जबनाबाई सोनवणे आदिंनी समाधान व्यक्त केले आहे.

"नेर गावात पाणी,भूमिगत गटार,सार्वजनिक स्वच्छता,दिवाबती,रस्ते,विकास कामासोबत नवनवीन संकल्पना अंमलात आणून गावात ग्रामपंचायती मार्फत विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे.त्याचाच एक भाग म्हणून 14 वा वित्त आयोग निधितून 42 सिमेंट कॉंक्रीट बाक आणि 2 शवपेटी यांचे लोकार्पण करण्यात आले.गावात विविध चौकात बसण्याची सोय त्यामुळे होणार आहे.त्याचप्रमाणे शवपेटी मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शव चांगल्या स्थितीत रात्रभर ठेवून सकाळी त्यावर अत्यंविधी करता येईल."
- शंकरराव खलाणे  सरपंच नेर ग्रामपंचायत (ता.धुळे)

उत्तर महाराष्ट्र

पंचवटी - आम्ही पोलिस असून, तुमच्या घरात राहात असलेल्या मुली वेश्‍याव्यवसाय करतात, असे समजल्यावरून कारवाई करण्यासाठी आलो आहोत....

02.00 PM

नाशिक - शहरात स्वाइन फ्लू व डेंगीचा विळखा पडला असताना त्यावर प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी महापालिकेत बहुमत असलेल्या सत्ताधारी...

02.00 PM

पंचवटी - त्र्यंबकेश्‍वर परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली. खबरदारीचा उपाय म्हणून...

02.00 PM