सकाळचे बातमीदार ते गटविकास अधिकारी : सी.के. माळी

जगन्नाथ पाटील
गुरुवार, 22 जून 2017

कापडणे : गडचिरोलीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.के. माळी यांची धुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी प्रशासकीय बदली झाली आहे. सकाळ धुळे जिल्ह्यात सुरू झाला त्यावेळचे ते कापडणे येथील पहिले बातमीदार होते. नंदुरबार, तळोदा, धडगाव व शहादा येथे उत्तम अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला आहे.

कापडणे : गडचिरोलीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.के. माळी यांची धुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी प्रशासकीय बदली झाली आहे. सकाळ धुळे जिल्ह्यात सुरू झाला त्यावेळचे ते कापडणे येथील पहिले बातमीदार होते. नंदुरबार, तळोदा, धडगाव व शहादा येथे उत्तम अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला आहे.

गटविकास अधिकारी चंद्रकांत काशिनाथ माळी हे महाविद्यालयीन जीवनापासून सी.के. माळी म्हणून परिचित आहेत. केंद्र सरकारच्या नेहरू युवा मंडळाच्या माध्यमातून मोठे सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्यावर त्यावेळी सत्यशोधक समाज व काॅम्रेड शरद पाटील यांच्या विचारसरणीचा पगडा होता. त्यांनी विवाह सत्यशोधक पध्दतीने झाला केला होता. 1991 मध्ये हा विवाह जिल्ह्यात औत्सुक्याचा ठरला होता. त्यांचे वडील कै. काम्रेड काशिनाथ माळी यांनी गोवामुक्ती लढ्यात तुरुंगवास सोसला होता.

सकाळचे बातमीदार
1989 ते 92 मध्ये गटविकास अधिकारी माळी हे सकाळचे कापडणे येथील पहिले बातमीदार होते. त्यावेळी विविध समस्यांना वाचा फोडतांना युवकांची विधायकता यावर विपुल लेखन केले होते. 'आपला महाराष्ट्र'मधील बहर पुरवणीतही लेखन करायचेत.

श्रमसाफल्य हाॅटेलचा मालक ते...
श्रमसाफल्य नावाची चहा हाॅटेलही त्यांनी नोकरी लागेपर्यंत चालविली होती. हाॅटेलवर तत्कालीन सर्वच पेपर यायचेत. येथे वाचनाच्या माध्यमातून युवकांचा गोतावळा तयार झाला. गावात विधायक उपक्रम सुरु करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. रशियातील अरबेनिया प्रातांतील भूकंप प्रसंगी त्यांनी बुटपाॅलिश उपक्रम राबविला होता. ती मदत पाठविली होती. येथील नदी चौकातील मोठे वृक्ष जे आज आहेत. ते त्यांनीच 1990 मध्ये लावले होते.

मनुकुमार श्रीवास्तव यांनी...
सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ राबवितांना तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांच्या संपर्कात आलेत. अन् स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. ते यशस्वीही झाले. विस्तार अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य प्रकल्प अधिकारी ते गटविकास अधिकारी असा प्रवास सुरू आहे.