जैताणेतील तेजस्वीची टीव्ही मालिकेसाठी निवड...

प्रा. भगवान जगदाळे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील मूळ रहिवासी व सद्या पुणेस्थित, तिसऱ्या इयत्तेत शिकणारी तेजस्वी प्रदीप भदाणे (वय-9 वर्षे) या चिमुरडीची सद्या दररोज रात्री साडेआठ ते नऊ दरम्यान 'अँड टीव्ही' ('& TV') चॅनलवर प्रसारित होणाऱ्या "परमावतार श्रीकृष्ण" या मालिकेत बालकलाकार म्हणून निवड झाली आहे.

सद्या ती मालिकेच्या शूटिंगसाठी आपल्या परिवारासह मुंबईत वास्तव्यास असून तिने या मालिकेत राधाची सखी "ललिता"ची भूमिका साकारली आहे. या मालिकेसाठी एकूण 350 बालकलाकारांची निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यातून 'तेजस्वी' भदाणेची यशस्वी निवड झाली आहे. तेजस्वी भदाणे हिने पुणे येथे अभिनयाचे क्लासेस लावले असून, भविष्यात तिचे चित्रपट सृष्टीत नामांकित अभिनेत्री बनायचे स्वप्न आहे.

तेजस्वी भदाणे ही जैताणे (ता. साक्री) येथील सामाजिक कार्यकर्ते कै. नामदेव बुला चौधरी (भदाणे) यांच्या कुटुंबातील बापू नामदेव भदाणे यांची नात असून, सौ. दीपाली व प्रदीप भदाणे यांची कन्या आहे. तिचे वडील प्रदीप भदाणे हे पुणे येथीलच 'भारत फोर्ब्स' ह्या एका खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील चिमुरडीची टीव्ही मालिकेत निवड झाल्याने तिचे माळमाथा परीसरातील निजामपूर-जैताणेसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Web Title: dhule news tejaswi bhadane selected paramavatar shri krishna serial