दारू दुकान, हाॅटेलविरोधात महिलांचे भजन आंदोलन

रमाकांत घोडराज
बुधवार, 14 जून 2017

जिल्हाधिकारी कार्यालय उदासीन 
दरम्यान, पोलिसांचे सहकार्य लाभते आहे, मात्र दुकाने हटविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिसाद नसल्याचे नगरसेविका दुसाने म्हणाल्या. गुरू दत्त मंदिरातील महिलांच्या भजनी मंडळाच्या माध्यमातून नगरसेविका दुसाने, वंदना विश्‍वकर्मा, मेघना चौधरी, मनीषा चौधरी, उषा सराफ, वैशाली पाटील, कीर्ती सराफ, विद्या उपासनी यांच्यासह 20 ते 25 महिला भजन आंदोलन करीत आहेत.

धुळे : शहरातील नकाणे रोड परिसरातील प्रमोदनगर सेक्‍टर- 2 मध्ये पूर्वीपासून अस्तित्वातील बिअरबार आणि या बिअरबारजवळच पुन्हा नव्याने झालेले मद्य विक्री दुकान तत्काळ हटविण्यासाठी रहिवाशी महिलांनी मंगळवारी रात्री या बिअरबार, मद्य विक्री दुकानासमोर भजन आंदोलन सुरू केले. असे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी इतर काॅलनी रहिवाशांनी गर्दी केली आणि त्यांनी आंदोलक महिलांच्या धाडसाचे कौतुक करून पाठबळ दिले. 

या प्रकरणी ठोस कारवाई होईपर्यंत रोज भजन आंदोलन सुरू राहिल, असे भाजपच्या नगरसेविका वैभवी दुसाने यांनी बुधवारी 'सकाळ'ला सांगितले. 

रात्रीतून मद्य दुकान सुरू 
प्रमोदनगरमध्ये एका बंगल्यात वाइन शॉप सुरू करण्याचा घाट घातला गेला. परिसरातील नागरिकांच्या लक्षात येणार नाही या पद्धतीने या ठिकाणी वाइन शॉप सुरू करण्याचा प्रयत्न झाला. एका रात्रीतून तेथे मद्याच्या बाटल्या आणल्या गेल्या. शिवाय बाहेरून कुलूप व आतमधून दुकान सुरू, असा प्रकार येथे संबंधित दुकान मालकाने केल्याचा आरोप रहिवाशांनी केला. शिवाय त्याच ठिकाणी रस्त्याला लागून कुणाल बिअरबार आहे. या बिअरबारचाही परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. परिसरात शाळा, मंदिरे असल्याने तसेच या मद्य विक्री दुकानांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे म्हणत रहिवाशांनी या मद्य विक्री दुकानांना विरोध करत ते हटविण्याची मागणी केली. 

भजन आंदोलन
या प्रकरणी प्रभागातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक कमलेश देवरे, नगरसेविका दुसाने यांच्या नेतृत्वात ९ जूनला आंदोलन झाले. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाली. मात्र, ही दुकाने हटविण्याबाबत अद्याप काहीही कार्यवाही होत नसल्याने महिलांनी भजन आंदोलन सुरू करून निषेध नोंदविला.

दुकाने हटेपर्यंत आंदोलन 
पूर्वीचा बिअरबार व नव्याने सुरू केलेले मद्य विक्री दुकान हटविले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करत नगरसेविका दुसाने व परिसरातील महिलांनी मंगळवारी सायंकाळी सातनंतर कुणाल बिअरबारसमोर भजन आंदोलन सुरू केले. ते रात्री दहापर्यंत सुरू होते. बुधवारी आणखी महिला या आंदोलनात सहभागी होतील, असे नगरसेविका दुसाने यांनी सांगितले. 

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर ठाणे अंमलदाराकडून तक्रार दाखल करून घेतली जाईलच याची खात्री नसते....

01.27 AM

भुसावळ : येथील बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांच्या घरावर एैनपूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज (...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017