धुळ्यात आता इमारतींचे मजले वाढणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

नवीन नियमावलीनुसार बांधकामांना मंजुरी; "टीडीआर'चाही लाभ
धुळे - इमारत बांधकाम व विकास नियंत्रण नियमावलीला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर येथील महापालिकेने मंगळवारपासून (1 नोव्हेंबर) या नियमावलीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे एक नोव्हेंबरपासून सादर होणारे बांधकामाचे प्रस्ताव आता नवीन नियमावलीनुसार मंजूर करण्यात येणार आहेत. दरम्यान, आता 1.1 चटईक्षेत्र (एफएसआय) मंजूर झाल्याने शहरात सध्याच्या तीनऐवजी पाच ते सहा मजले होऊ शकतील.

महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 च्या तरतुदीनुसार स्थापन केलेल्या समितीने राज्यातील सर्व "ड' वर्ग महापालिकांसाठी इमारत बांधकाम व विकास नियंत्रण नियमावलीची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. या अधिसूचनेवर हरकती, सूचना मागवून त्यांची सुनावणी घेण्यात आली व त्यानंतर शासनाने 20 सप्टेंबर 2016 ला अंतिम इमारत बांधकाम व विकास नियंत्रण नियमावली मंजूर केली.

अंमलबजावणी सुरू
नवीन बांधकाम नियमावलीची एक नोव्हेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ एक "एफएसआय' असल्याने तीन मजल्यांच्या वर बांधकामाला शहरात परवानगी नव्हती. नवीन नियमावलीनुसार मात्र महापालिका क्षेत्रात 1.1 "एफएसआय' मंजूर आहे. त्यामुळे या वाढीव "एफएसआय'चा बांधकामासाठी फायदा होणार आहे. कोणत्या झोनमध्ये किती रुंदीचा रस्ता आहे, त्याआधारे या वाढीव "एफएसआय'चा फायदा होऊ शकणार आहे.

"टीडीआर'चाही फायदा
धुळे महापालिका क्षेत्रात यापूर्वी "टीडीआर'चा (हस्तांतरणीय बांधकाम क्षेत्र) फायदा घेता येत नव्हता. नवीन नियमावलीनुसार मात्र या "टीडीआर'चाही फायदा घेता येणार आहे.

"टीडीआर'च्या लाभासाठी तयार
राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर दत्त मंदिर ते स्वामिनारायण मंदिर रस्त्याचे काम मंजूर आहे. या रस्त्याच्या कामात काही घरांचे वाढीव बांधकाम तोडावे लागणार आहे. या बांधकामाच्या बदल्यात संबंधित मालमत्ताधारकांना "टीडीआर' देण्यात येणार आहे. या रस्त्यावरील 70-72 मालमत्ताधारक असा "टीडीआर'चा लाभ घेण्यास तयार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार "टीडीआर प्रमाणपत्र' छापण्याची प्रक्रियाही महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

उत्तर महाराष्ट्र

जळगाव : 'त्या आठही प्रवाशांचा जीव वाचवता आला असता, तर शौर्याचा आनंद साजरा केला असता..' अशा शब्दांत अमरनाथ यात्रेत दहशतवादी...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

जेलरोड (नाशिक) - "मातीच्या ढिगाऱ्याला कधी कोणी नमस्कार करतांना पाहिले आहे का?किंवा रस्त्यामध्ये पडलेली माती पायदळी तुडवली गेली...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नाशिक - ऋषिमुनींची तपोभूमी, सिद्धांची योगभूमी, फुलांच्या मुबलक आवकेमुळे गुलशनाबाद, यात्रेकरूंचं (पिलग्रीम), द्राक्ष (...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017