दुष्काळाच्या सावटाखालील तालुके प्रभारी यंत्रणेकडे  

Drought-hit Taluks in extra charge system
Drought-hit Taluks in extra charge system

नांदगाव : तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे जनावरांच्या चाऱ्यापासून शेतीपर्यंत सगळीकडे दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. मात्र, त्यावर उपाययोजना करणारी प्रशासकीय यंत्रणा प्रभारी स्वरूपाची असल्याने यावर मात करण्यासाठी तालुक्याला पूर्णवेळ तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्याची गरज आहे. त्यांची नियुक्ती तातडीने करण्याची आवश्यकता माजी आमदार अॅड अनिल आहेर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. अॅड आहेर यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याशी झालेल्या भेटीप्रसंगी नांदगाव तालुक्यातील महसूल, कृषी आदी विविध पातळीवर निर्माण झालेल्या विदारकतेकडे त्यांचे लक्ष वेधले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील, डॉक्टर प्रभाकर पवार यावेळी उपस्थित होते.

ज्या भागात पेरणी झालेली आहे, त्या ठिकाणी पाउस नसल्याने पिके जळू लागलेली आहेत. त्याठिकाणी दुबार पेरणीचे संकट राहिले आहे व दुसऱ्या बाजूला तालुक्याच्या काही भागात पाऊसच पडलेला नाही. सध्याच्या स्थितीत तालुक्यात पाउस न पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे. तालुक्याच्या धरणसाठ्यामध्ये कुठेही वाढ झालेली नाही. तालुक्याच्या अनेक गावातून टँकंरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासोबतच जनावराच्या चारा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्याची हि भीषण परिस्थिती बघता व तालुक्यातील या पूर्वी झालेल्या शेतकऱ्यांच्या वाढीव आत्महत्या लक्षात घेता तात्काळ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करणे आवश्यक आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचे टँकंर्सची मागणी मान्य करून त्वरित टँकंर उपलब्ध करून देण्यात यावे.

जनावरासाठी गुरांच्या चारा छावण्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात व त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी म्हणून आपण स्वतः तालुक्याची पाहणी करून तालूक्यातील प्रशासनांला या संदर्भात आढावा घेऊन तात्काळ योग्य ते कार्यवाही करण्याचे आदेश: आपल्या स्तरावरून देण्यात यावेत. तसेच नांदगाव तालुक्यातील तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी हि दोन्ही पदे गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त आहेत. सध्यस्थितीत तालुक्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनाची प्रभावी अंमलबजावणीसाठी. सदरची दोन्ही पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. दोन्ही विभागाचे कामकाज प्रभारी स्वरुपात चालू आहे. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने व कामाचा व्याप जास्त तात्काळ हि दोन्ही पदे भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय या भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करणे जिकरीचे होणार आहे. ही दोन्ही पदे शेतकऱ्यांच्या संबधीत असल्या कारणाने सदरची पदे तातडीने भरणे कामी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com